शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:18 IST

वाशिम : अल्प उपस्थितीच्या अंगणवाड्यांचे एकत्रिकरण करणे, सुधारीत अंगणवाड्यांची संख्या निश्चित होईपर्यंत अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्यावर निर्बंध आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अल्प उपस्थितीच्या अंगणवाड्यांचे एकत्रिकरण करणे, सुधारीत अंगणवाड्यांची संख्या निश्चित होईपर्यंत अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्यावर निर्बंध आहेत. तथापि, राज्यातील वाशिमसह चार आकांक्षित जिल्ह्याला या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील रिक्त पदांचा आढावा घेतला असता, अंगणवाडी सेविकांची ३८ तर मदतनिसांची ५० पदे भरली जाणार आहेत.‘अंब्रेला’ एकात्मिक बालविकास सेवा योजना या मुख्य योजनेखाली राबविण्यात येणाºया ‘अंगणवाडी सेवा’ या उपयोजनेखाली यापुढे अंगणवाडी केंद्रे तसेच क्षेत्रीय कार्यालये कार्यरत राहणार आहेत. सुधारीत अंगणवाड्यांची संख्या निश्चित होईपर्यंत सेविकांची रिक्त पदे न भरण्याबाबत राज्याच्या वित्त विभागाच्या दिलेल्या सुचनेनुसार रिक्त पदांची भरती प्रक्रिया थांबलेली आहे. तथापि, आदिवासी भागातील तसेच आकांक्षित जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून शासनस्तरावर मागणी झाली होती. या मागणीची दखल घेत आकांक्षित जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्याला महिला व बालविकास विभागाने हिरवी झेंडी दिलेली आहे. त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांची एकूण १०११ पदे मंजूर असून, ९७३ पदे भरलेली आहेत तर ३८ पदे रिक्त आहेत. याप्रमाणेच अंगणवाडी मदतनिसांची १०११ पदे मंजूर असून ९६१ पदे भरली आहेत तर ६० पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याची कार्यवाही केली जाणार आहे, असे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमEmployeeकर्मचारी