शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषदेत रिक्त पदांचा तिढा कायमच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 19:11 IST

Washim Zp सीईओंसह १२ विभाग प्रमुख आणि पाच पंचायत समित्यांना कायमस्वरुपी गटविकास अधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाजाचा खोळंबा होत आहे.

ठळक मुद्देसीईओंसह १२ विभागाला प्रमुख केव्हा मिळणार?जिल्हा परिषदेतील कामकाज प्रभावित.

:वाशिम : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह (सीईओ) १२ विभाग प्रमुखांच्या रिक्त पदासंदर्भात पालकमंत्री शंभुराज देसाई आणि राज्याच्या मुख्य सचिवांमध्ये बैठक होऊन २० दिवसांचा कालावधी उलटला. अद्याप एकाही अधिकाºयाची नियुक्ती जिल्हा परिषदेत झाली नसल्याने, ही उच्चस्तरीय बैठकही निष्फळ ठरल्याचे तुर्तास तरी दिसून येते. सीईओंसह १२ विभाग प्रमुख आणि पाच पंचायत समित्यांना कायमस्वरुपी गटविकास अधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाजाचा खोळंबा होत आहे.मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. वाशिम जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत, वित्त व लेखा, कृषी, पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन, बांधकाम, लघु सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, जिल्हा पाणी व स्वच्छता, रोजगार हमी योजना असे १७ विभाग प्रमुख आहेत. यापैकी कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, आरोग्य, जिल्हा पाणी व स्वच्छता या सात विभागाचा अपवाद वगळता उर्वरीत १२ विभागाला कायमस्वरुपी प्रमुख नसल्याने या विभागाचा प्रभार अन्य कार्यरत अधिकाºयांकडे सोपविण्यात आला. दरम्यान,  जिल्ह्यातील कारंजाचा अपवाद वगळता उर्वरीत पाच पंचायत समित्यांना कायमस्वरुपी गटविकास अधिकारी (बीडिओ) नसल्याने कामकाजात खोळंबा निर्माण झाला आहे. तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांची ९ सप्टेंबर रोजी बदली झाली. तेव्हापासून येथे मुख्य कार्यकारी अधिकाºयांची नियुक्ती झाली नाही. जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरण्यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत स्वत:सह सर्व पदाधिकारी व सदस्य हे उपोषण आंदोलन छेडतील, असा इशारा दिला होता. यासंदर्भात पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी २४ सप्टेंबर रोजी मुख्य सचिवांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले होते. 

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद