शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या निरूपयोगी साहित्याचा पुनर्प्रक्रियेसाठी वापर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 15:40 IST

निरूपयोगी साहित्य इतरत्र टाकून न देता पुनर्प्रक्रियेसाठी पुनर्वापर करणाºया कंपन्या, संस्थांकडे सुपूर्द करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेला १ जून रोजी दिले आहेत.

वाशिम : पाणीपुरवठा योजना राबविताना वापरण्यात येणाºया विविध एचडीपीई, पीव्हीसी जलवाहिन्यांचे वापरात न येणारे लहान तुकडे, तुटके भाग तसेच पाईप्स् जोडताना तयार होणारा कचरा त्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात राहत असल्याने पर्यावरणविषयक समस्या निर्माण होत असल्याच्या निष्कर्षाप्रत पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आला आहे. या पृष्ठभूमीवर सदर निरूपयोगी साहित्य इतरत्र टाकून न देता पुनर्प्रक्रियेसाठी पुनर्वापर करणाºया कंपन्या, संस्थांकडे सुपूर्द करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेला १ जून रोजी दिले आहेत.राज्यात पाणी पुरवठ्याच्या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदांमार्फत राबविण्यात येतात. सदर योजना राबविताना वापरण्यात येणाºया विविध एचडीपीई, पीव्हीसी जलवाहिन्यांचे वापरात न येणारे लहान तुकडे, तुटके भाग तसेच एचडीपीई, पीव्हीसी पाईप्स् जोडताना तयार होणारा कचरा त्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात सोडला जातो. सदर साहित्य निरुपयोगी असले तरी हा अविघटनशील स्वरुपाचा कचरा पडून राहिल्याने पर्यावरणविषयक समस्या निर्माण होतात. सदर समस्या टाळण्यासाठी पाणी पुरवठा योजनेसाठी वापरण्यात येणाºया एचडीपीई, पीव्हीसी जलवाहिन्यांचे शिल्लक तुकडे, तुटके भाग आदि साहित्याची योग्यरित्या विल्हेवाट लावण्याबाबत संबंधित कंत्राटदारास सूचना देण्याची दक्षता जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणेने घ्यावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिल्या आहेत. जलवाहिन्यांचे वापरायोग्य नसणारे तुकडे, तुटके भाग आदी साहित्य कामाच्या ठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित उप अभियंता, शाखा अभियंता यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. कंत्राटदारांनी हा एचडीपीई, पीव्हीसी कचरा गोळा करून इतरत्र टाकून न देता पुनर्प्रक्रियेसाठी पुनर्वापर करणाºया कंपन्या, संस्था किंवा व्यक्तींकडे पाठवावा, अशा सूचनाही पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिल्या आहेत.

 पाणीपुरवठा योजनांचे काम करताना निरुपयोगी साहित्य त्या ठिकाणी राहणार नाही, याची दक्षता घेतली जाते. यापुढेही दक्षता घेण्यात येईल तसेच संबंधित अभियंता, कंत्राटदारांना सूचना दिल्या जातील. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल.-नीलेश राठोडकार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागजिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमwater transportजलवाहतूक