शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा, तूरीचे अनुदान तातडीने देण्याची मागणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 15:34 IST

वाशिम : किमान आधारभूत किंमतीनुसार हरभरा, तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या; परंतू विहित मुदतीत खरेदी होऊ न शकलेल्या शेतकºयांना प्रती क्विंटल एक हजार रुपये अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक यांच्यासह शेतकºयांनी २२ जून रोजी शासन व जिल्हा प्रशासनाकडे केली.

ठळक मुद्देपणन महासंघ व विदर्भ पणन महासंघामार्फत तूरची खरेदी १ फेब्रुवारी २०१८ तर हरभरा खरेदी १ मार्च २०१८ पासून सुरू केली होती.तूर उत्पादक ३० हजार शेतकरी तर हरभरा उत्पादक सात हजार शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी होऊ शकली नाही. सध्या खरिप हंगाम सुरू असल्याने वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना सदर अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सरनाईक यांनी केली. 

वाशिम : किमान आधारभूत किंमतीनुसार हरभरा, तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या; परंतू विहित मुदतीत खरेदी होऊ न शकलेल्या शेतकºयांना प्रती क्विंटल एक हजार रुपये अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक यांच्यासह शेतकºयांनी २२ जून रोजी शासन व जिल्हा प्रशासनाकडे केली.किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने पणन महासंघ व विदर्भ पणन महासंघामार्फत तूरची खरेदी १ फेब्रुवारी २०१८ तर हरभरा खरेदी १ मार्च २०१८ पासून सुरू केली होती. यासाठी शेतकºयांना आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक होते. विहित मुदतीत आॅनलाईन नोंदणी केल्यानंतरही वाशिम जिल्ह्यातील तूर उत्पादक ३० हजार शेतकरी तर हरभरा उत्पादक सात हजार शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी होऊ शकली नाही. १५ मे २०१८ पासून तूरीची खरेदी बंद झालेली आहे तर १४ जून २०१८ पासून हरभºयाची खरेदी बंद झालेली आहे. तूर व हरभरा खरेदीसाठी नोंदणी  केलेल्या; परंतू त्यांच्याकडून तूर व हरभºयाची खरेदी झाली नाही अशा शेतकºयांना प्रती क्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय ५ मे  २०१८ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला होता. त्या अनुषंगाने तूर व हरभºयाची खरेदी न झालेल्या शेतकºयांना प्रती क्विंटल एक हजार रुपये याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. सध्या खरिप हंगाम सुरू असल्याने वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना सदर अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सरनाईक यांनी शुक्रवारी केली. तूर विक्रीसाठी जिल्ह्यातील एकूण ४१ हजार ५८ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी १० हजार ६४८ शेतकºयांची एक लाख ४९ हजार ७९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली तर उर्वरीत ३० हजार ४१० शेतकºयांची तूर खरेदी बाकी आहे. हरभरा विक्रीसाठी जिल्ह्यातील एकूण ११ हजार ३७८ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. १३ जूनपर्यंत ४ हजार शेतकºयांच्या हरभºयाची खरेदी झाली. उर्वरीत सात हजार शेतकºयांच्या हरभºयाची खरेदी बाकी आहे. आता मातीमोल भावाने तूर व हरभºयाची विक्री खासगी तसेच बाजार समित्यांमध्ये करावी लागत आहे.

टॅग्स :washimवाशिमMarketबाजार