शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

वाशिम जिल्ह्यातील ९२ किलोमीअर अंतराच्या रस्त्यांचे अद्ययावतीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 4:47 PM

वाशिम: अत्यंत वाईट अवस्था झालेल्या रस्त्यांच्या अद्ययावतीकरणाची मोहिम शासनाकडून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, पहिल्या टप्प्यात मंजुरी मिळालेल्या ९ रस्त्यांच्या मिळून एकूण ९२ किलोमीअर अंतराच्या रस्त्यांचे अद्ययावतीकरण येत्या १ मेपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकर्त्यांनी अभियंत्यांनी मंगळवारी दिली. रस्त्य्यांचे अद्ययावतीकरण करून ...

ठळक मुद्देअत्यंत वाईट अवस्था झालेल्या रस्त्यांच्या अद्ययावतीकरणाची मोहिम शासनाकडून राबविण्यात येत आहे.मंजुरी मिळालेल्या ९ रस्त्यांच्या मिळून एकूण ९२ किलोमीअर अंतराच्या रस्त्यांचे अद्ययावतीकरण येत्या १ मेपर्यंत करण्यात येणार. या कामाच्या कार्यारंभ आदेशानंतर संबंधित कंत्राटदाराला निर्धारित मुदतीत ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत.

वाशिम: अत्यंत वाईट अवस्था झालेल्या रस्त्यांच्या अद्ययावतीकरणाची मोहिम शासनाकडून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, पहिल्या टप्प्यात मंजुरी मिळालेल्या ९ रस्त्यांच्या मिळून एकूण ९२ किलोमीअर अंतराच्या रस्त्यांचे अद्ययावतीकरण येत्या १ मेपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकर्त्यांनी अभियंत्यांनी मंगळवारी दिली. 

रस्त्य्यांचे अद्ययावतीकरण करून दळणवळणाच्या समस्या दूर करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यातच राज्यभरातील हजारो रस्त्यांची गेल्या काही वर्षांत दूरावस्था झालेली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागांकडे शेकडो तक्रारीही करण्यात आलेल्या आहेत. या पृष्ठभूमीवर राज्यभरातील नादुरुस्त रस्त्यांच्या अद्ययातीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात काही रस्त्यांच्या कामांमा मंजुरी देण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ९ रस्त्यांचा समावेश आहे. प्रत्येकी १० किलोमीटर अंतर मिळून एकूण ९२ किलोमीटर अंतराचे रस्ते या अंतर्गत अद्ययावत करण्यात येणार आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या महिनाभरानंतर ही सुरू होणार आहेत. वाशिम जिल्ह्यात मंजुरी मिळालेल्या रस्त्यांमध्ये वाशिम मालुक्यातील चिंचखेडा-वारा जहागिर- पार्डी आसरा या रस्त्याचे २८.०० ते ३८.०० हे दहा किलोमीटर अंतराचे काम ३ कोटी रुपये खर्चून, अमानी-अटकळी-केकतउमरा या रस्त्यावरील २१.०० ते ३१.४०० किमोमीटर अंतराचे काम ३ कोटी रुपये खर्चून होणार आहे. त्याशिवाय मालेगाव तालुक्यातील जऊळका-पांगराबंदी या रस्त्यावरील ८.०० ते १८.०० किलोमीटर अंतरांचे काम २ कोटी ९९ लाख ९० हजार रुपये खर्चून होणार आहे. मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा-तºहाळा या रस्त्याचे १.५०० ते ११.५०० किलोमीटर अंतराचे काम ३ कोटी रुपये खर्चून, धानोरा=आसेगाव कुंभी या रस्त्याचे ०० ते ११.५०० किलोमीटर अंतराचे काम ३ कोटी रुपये खर्चून होणार आहे. मानोरा तालुक्यातील मानोराज्ञ्-शेंदुरजना-वाईगौळ  या रस्त्यावरील २५.०० ते ३५.०० किलोमीटरपर्यंतच्या अंतराचे  काम ३ कोटी रुपये खर्चून, तर कारंजा तालुक्यातील कामरगाव-वाडेगाव-भामदेवी-धोत्रा या रस्त्यावरील १०.०० ते २०.०० किलोमीटर अंतरापर्यंतचे काम ३ कोटी रुपये खर्चून,  कारंजा-मोखड-कामरगाव या रस्त्यावरील ४.०० ते १४.०० किलोमीटरपर्यंतच्या अंतराचे काम ३ कोटी रूपये खर्चून, तसेच कारंजा ते धनज या रस्त्यावरील १२.५०० ते २२.५०० किलोमीटर अंतरापर्यंतचे काम २ कोटी ९९ लाख रुपये खर्चून केले जाणार आहे. या कामाच्या कार्यारंभ आदेशानंतर संबंधित कंत्राटदाराला निर्धारित मुदतीत ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदारावरच त्याच्या वाढलेल्या खर्चाची जबाबदारी राहणार, असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :washimवाशिमpwdसार्वजनिक बांधकाम विभाग