अवकाळी पाऊस; गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:37 AM2021-03-22T04:37:52+5:302021-03-22T04:37:52+5:30

या गारपिटीमुळे सर्वाधिक फटका बिजवाई कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. या परिसरातील लाठी, येडशी, शेलूबाजार, चिखली या गावांचा ...

Unseasonal rain; A hailstorm | अवकाळी पाऊस; गारपिटीचा तडाखा

अवकाळी पाऊस; गारपिटीचा तडाखा

Next

या गारपिटीमुळे सर्वाधिक फटका बिजवाई कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. या परिसरातील लाठी, येडशी, शेलूबाजार, चिखली या गावांचा विचार केला, तर ५० एकराच्यावर बिजवाई कांद्याची लागवड शेतकर्‍यांनी केली आहे.

यामध्ये येडशी येथील नारायण बारड, दत्तात्रय बारड, समाधान पवार, भीमराव सावध, रिंकू बारड, मंगेश बारड, श्याम आडे, मच्छिंद्र नाईक, नंदू बारड, सुधाकर शेजव, तर चिखली प्रल्हाद राऊत, अविन चौधरी, अरुण चौधरी, खुशाल चौधरी, शेलूबाजार संतोष लांभाडे, किशोर गाडगे व लाठी येथे गणेश सुर्वे, किशोर सुर्वे, बाळू सुर्वे, मुरलीधर सुर्वे यांनी बिजवाई कांद्याची लागवड केली होती. त्याच चिखली येथील ज्ञानेश्वर डोंगरे यांच्या शेतातील ऊस, पपई फळबागांना फटका बसला आहे. वादळी व गाराच्या पावसामुळे यामधील बऱ्याच शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

लाठी येथे काढणीला आलेल्या गहू, तथा भाजीपाल्यासह रब्बी पिकांना जबर फटका बसला आहे. नुकसानीत सर्वाधिक आकडा हा बिजवाई कांद्याचा झाला आहे. सोबतच पपई, टरबूज, ऊस या फळबागेला गारपिटीचा तडाखा बसला आहे . चिखली येथील प्रल्हाद चौधरी यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतातील पपई, टरबूज तसेच बिजवाई कांद्याचे नुकसान झाले. त्यांनी नुकसानीचा आकडा हा १० ते १२ लाखांचा असल्याचे सांगितले आहे.

एकीकडे उन्हाच्या झळा बसत आहेत, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे. शासनाने गारपीट भागाचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Web Title: Unseasonal rain; A hailstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.