शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

मालेगाव तालुक्यात विनापरवाना वृक्षतोड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 15:45 IST

मालेगाव तालुक्यात अवैध मार्गाने वृक्षतोड करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक केल्या जात आहे.

मालेगाव : मालेगाव तालुक्यात अवैध मार्गाने वृक्षतोड करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक केल्या जात आहे. या प्रकाराकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यालगतची झाडे तोडण्याचे प्रकार वाढीस लागतात. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या बुंध्याला आग लावून झाडांची अवैध तोड केली जाते. आता तर वनविभागाची कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता रस्त्याच्या दुतर्फाची झाडे सर्रास तोडली जात आहे.लाकडाच्या व्यवसायात मोठा नफा असल्याने तालुक्यात अवैध लाकुड माफीया सक्रीय झाल्याचे दिसून येते. सदर माफीया शेतकºयांच्या शेतातील, रस्त्यालगतचा वन संरक्षित भाग, रस्त्याच्या कडेची झाडे तोडत असल्याचे दिसून येते. संरक्षित वन परिसरातील वृक्षाचे रक्षण करणे व अवैध वृक्षतोड थांबवणे, अवैध लाकूड वाहतुकीवर कारवाई करणे वनविभागाकडून अपेक्षित आहे. तालुक्यातील अनेक रस्त्यालगची झाडे भरदिवसा कटाई केल्या जात आहेत. एकीकडे राज्य सरकार ५० कोटी वृक्ष लागवड योजनेवर भर देत आहे तर दुसरीकडे अवैध वृक्षतोड होत असतानाही वनविभाग कारवाई करीत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.