शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात सोमवारपासून ‘अनलॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 11:59 IST

'Unlock' in Washim district from tomorrow : शासन नियमानुसार अनलॉकचे सुधारित नियम उद्या, सोमवारपासून लागू होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना पॉझिटिव्हिटी दर व ऑक्सिजनच्या बेडवरील रुग्णसंख्या यानुसार राज्य शासनाने उद्या, सोमवारपासून राज्यात पाचस्तरीय अनलॉक करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात समावेश असून, शासन नियमानुसार अनलॉकचे सुधारित नियम उद्या, सोमवारपासून लागू होणार आहेत.दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. गत सहा दिवसांपासून तर दोन अंकी संख्येत कोरोना रुग्ण येत असून, कोविड केअर सेंटरही ओस पडत असल्याचे आशादायी चित्र आहे. कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने १ जूनपासून जिल्ह्यात निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यात उद्या, सोमवारपासून म्हणजेच ७ जूनपासून पाचस्तरीय अनलॉक करण्यात येणार आहे, अशी घोषणा गुरुवारी (दि. ३) मध्यरात्रीनंतर राज्य शासनातर्फे करण्यात आली. कोरोना पॉझिटिव्हिटी दर व ऑक्सिजनच्या बेडवरील रुग्णसंख्या यानुसार हे स्तर ठरविण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर २.१ टक्के, तर आठ टक्के रुग्ण हे ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या स्तरात असून, शासन नियमानुसार अनलॉकच्या सुधारित नियमावलीची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे.

काय सुरू राहील ?अत्यावश्यक सेवेतील दुकाने ७ ते ४ वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार ७ ते ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहतील.हॉटेल्स, सलून, पार्लर ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत खुली राहतील. सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी ५ ते ९ यावेळेत सुरू राहतील.खासगी आणि सरकारी कार्यालयांत ५० टक्के क्षमतेने उपस्थिती राहील. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला ५० टक्के क्षमतेने (सभागृहाच्या) दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी राहील. 

काय बंद राहील?इन डोअर खेळामुळे कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहणार आहेत. दुपारी दोन वाजल्यानंतर हॉटेल्स बंद राहणार असून, त्यानंतर पार्सल सेवा सुरू राहील. शनिवारी आणि रविवारी हॉटेलही बंद राहतीलखासगी शिकवणी वर्गातून कोरोना संसर्ग होण्याचा धोका असल्याने खासगी शिकवणी वर्गही बंदच ठेवण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालये बंदच राहणार आहेत.

शासनाच्या सूचनेनुसार वाशिम जिल्ह्यात अनलॉकच्या सुधारित नियमावलीची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी यापुढेही कोरोनाविषयक नियमांचे पालन करून कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी. - शण्मुगराजन एस., जिल्हाधिकारी, वाशिम 

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक