शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेंतर्गत कारंजा तालुक्यातील विहिरींच्या देयकाचा तिढा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 18:37 IST

कारंजा लाड - रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील ग्राम काजळेश्वर येथील २० ते २५ विहिरी मंजूर असून, या विहिरींच्या देयकाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विहीरीचे काम मजुरांऐवजी  मशिनने करायचे असल्यास संबंधितांकडून पैशाची मागणी होत असल्याची आपबिती काजळेश्वर येथील ग्रामपंचायत माजी सदस्य मो. जमील मो. अफजल व अन्य लाभार्थींनी १५ डिसेंबर रोजी जिल्हाधिका-यांकडे मांडली. 

ठळक मुद्देशेतक-यांची प्रशासनाकडे धाव न्याय देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड - रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील ग्राम काजळेश्वर येथील २० ते २५ विहिरी मंजूर असून, या विहिरींच्या देयकाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विहीरीचे काम मजुरांऐवजी  मशिनने करायचे असल्यास संबंधितांकडून पैशाची मागणी होत असल्याची आपबिती काजळेश्वर येथील ग्रामपंचायत माजी सदस्य मो. जमील मो. अफजल व अन्य लाभार्थींनी १५ डिसेंबर रोजी जिल्हाधिका-यांकडे मांडली. निवेदनानुसार, काजळेश्वर येथील रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकरी लाभार्थींना सिंचन विहिरी मंजुर झाल्या आहेत. परंतू लाभार्थ्यांनी मजुराव्दारे विहिरी न खोदता ठेका पध्दतीने विहिरी खोदण्याकरीता दिल्या आहे. संबंधित ठेकदार हा मजुरी पध्दतीने न करता मशिनद्वारे विहिरींची कामे करीत असून, खोटे मस्टर भरले जात असल्याचा आरोप लाभार्थींनी निवेदनाद्वारे केला. मशिनने विहिरी खोदलेल्या असताना विहिरीचे खोदकाम मजुरामार्फत केल्याचे दाखवून देयक काढत असल्याचा प्रकार निवेदनाद्वारे शेतकरी लाभार्थींनी समोर आणला आहे. काही शेतकरी स्वत: विहिरीचे खोदकाम करण्यास तयार आहे. या शेतकºयांना देयक काढून देण्याच्या नावाखाली पैशाची  केली जात असल्याचे निवेदनात नमूद आहे.जवळपास १५ ते २० हजार रूपयांची पुर्तता न केल्यास मजुरांची मागणी न घेणे, मस्टर न टाकणे, चालु विहीरीचे काम बंद करायला लावणे अशा प्रकारे अडथळा निर्माण करून शेतकºयांना मानसिक व आर्थिक त्रास दिला जात असल्याचा आरोप शेतकरी लाभार्थींनी केला आहे. काजळेश्वर येथील रोहयो अंतर्गत खोदकाम करण्यात आलेल्या विहिरींची चैकशी करून दोषी आढळणाºयाविरूद्ध कारवाई करावी तसेच विनाविलंब अनुदान देण्यात यावे, अशी  मागणी मो.जमील मो.अफजल व ईतर लाभार्थी शेतक-यांनी केली आहे. या निवेदनावर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे. 

टॅग्स :washimवाशिम