शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 17:49 IST

एका महिलेच्या पर्समधून दीड लाखांचे सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम घेवून पोबारा करणाऱ्या दोन महिला पोलिस कर्मचारी गजानन काळे यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे काही वेळातच जेरबंद झाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : गंगापूर येथून यवतमाळकडे जाणाºया बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून दीड लाखांचे सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम घेवून पोबारा करणाऱ्या दोन महिला पोलिस कर्मचारी गजानन काळे यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे काही वेळातच जेरबंद झाल्या. हा प्रकार सोमवार, १३ मे रोजी घडला. प्राप्त माहितीनुसार, दिपाली किरण आखाडे (रा. डोणगाव, ता.मेहकर, जि.बुलडाणा) ही महिला आपली मुलगी समृद्धी (वय १० वर्षे) आणि अर्पीत (वय दीड वर्षे) यांना घेवून गंगापूर-यवतमाळ बसने प्रवास करित होती. त्याच बसमध्ये पडदे विक्रीचे काम करणाºया दोन महिला बसून होत्या. दरम्यान, दिपाली आखाडे ह्या बसच्या वाहकाकडून तिकीट घेण्यासाठी पर्समधून पैसे काढत असताना पर्समध्येच ठेवून असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्या महिलांनी पाळत ठेवली व संधी मिळताच दागिने आणि काही रोख रक्कम लंपास केली. मालेगाव येथे दिपाली यांच्यासह चोरट्या महिला देखील बसमधून खाली उतरल्या. काही वेळानंतर पर्समधून दागिने लंपास झाल्याची बाब दिपाली यांच्या लक्षात आली. मात्र, दोन लहान मुले सोबत असल्याने नेमके काय करावे, या विवंचनेत त्या हतबल झाल्या. यावेळी कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी गजानन काळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दिपाली आखाडे व त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही लहान मुलांना पोलिस स्टेशनमध्ये आणून दिलासा दिला. सोबतच दिपाली यांना दुचाकीवर बसवून मालेगावच्या बाजारात चोरट्या महिलांचा शोध घेणे सुरू केले. सुदैवाने दोन्ही चोरट्या महिला एकाठिकाणी बसलेल्या आढळून आल्या. पोलिसी खाक्या दाखविताच दोघींनीही चोरीची कबुली देवून दागिने व पैसे परत केले. दरम्यान, घडलेल्या चोरीच्या घटनेची तत्काळ दखल घेवून पिडित महिलेला न्याय मिळवून देणारे पोलिस कर्मचारी गजानन काळे यांचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. याप्रकरणी दिपाली आखाडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी