शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

बस-दुचाकीच्या अपघातात दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:53 IST

शिरपूर जैन: अमरावतीवरून परतूरकडे जाणारी बस आणि विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकीमध्ये जबर अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची घटना चांडस येथे २२ ऑक्टोबरला दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास घडली. सत्यप्रकाश रमेश कंकाळ व ज्ञानेश्‍वर जग्गू राठोड दोघेही रा. मळसूर, जि. अकोला अशी मृतकांची नावे आहेत.  

ठळक मुद्देचांडस फाट्यानजीकची घटना मृतक अकोला जिल्हय़ातील

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: अमरावतीवरून परतूरकडे जाणारी बस आणि विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकीमध्ये जबर अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची घटना चांडस येथे २२ ऑक्टोबरला दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास घडली. सत्यप्रकाश रमेश कंकाळ व ज्ञानेश्‍वर जग्गू राठोड दोघेही रा. मळसूर, जि. अकोला अशी मृतकांची नावे आहेत.  शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणार्‍या औरंगाबाद-नागपूर द्र्रुतगती मार्गावरून रविवारी एम.एच.२0 बीएल १७0८ ही राज्य परिवहन मंडळाची बस अमरावतीवरून परतूरकडे जात होती. यावेळी मेहकरकडून मालेगावकडे येणार्‍या एम.एच. १४ बी.एच. २१६0 क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता, चांडस गावानजीक सदर दुचाकीची बसला जबर धडक लागली. या अपघातात दुचाकी वाहन पूर्णपणे बसच्या खाली घुसले होते. यामध्ये दुचाकीस्वार सत्यप्रकाश रमेश कंकाळ (२५) रा. मरसूळ, जि. अकोला हा जागीच ठार तर त्याचा मित्र ज्ञानेश्‍वर जग्गू राठोड (१९) रा. मळसूर ता. पातूर हा गंभीर जखमी झाला होता. जखमीला शिरपूर पोलिसांनी १0८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी वाशिम येथे पाठविले. येथून अकोला येथील रुग्णालयात नेत असताना, जखमी राठोड याचा मृत्यू झाला, अशी माहिती शिरपूर पोलिसांनी दिली. दुचाकीस्वाराने कानात इअर फोन लावलेला होता, असे पोलीस व प्रत्यक्षदश्रींनी सांगितले. या अपघातात बस पूर्णपणे रस्त्याच्या कडेला उतरली होती. सुदैवाने बसमधील कुणालाही इजा झाली नाही. अपघाताच्या या घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिपणे, पोहेकाँ माणिक खानझोडे, पो.काँ. रमेश मोरे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर एसटी बसचे चालक राजू चव्हाण हे स्वत:हून मालेगाव पोलीस स्टेशनला हजर झाले.

टॅग्स :Accidentअपघात