शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ५३३ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 12:54 IST

२८ जुलै रोजी आणखी दोन रुग्णांची भर पडली. आता कोरोनाबाधित रुग्णाची एकूण संख्या ५३३ वर पोहचली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, २८ जुलै रोजी आणखी दोन रुग्णांची भर पडली. आता कोरोनाबाधित रुग्णाची एकूण संख्या ५३३ वर पोहचली असून, यापैकी २०४ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (सक्रिय) आहेत.जिल्ह्यातील मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून प्रतिबंधात्मक उपाययोजन, संचारबंदी व लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मे महिन्यात परराज्य तसेच परजिलह्यातून मोठ्या संख्येने नागरीक जिल्ह्यात परतले. बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांमुळे जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. जुलै महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनावर अधिक ताण येऊ नये म्हणून तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर येथेही स्वॅब घेण्याची व्यवस्था करण्यात आली. स्वॅब नमुने तपासणीसाठी यवतमाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. २८ जुलै सकाळी प्राप्त अहवालानुसार दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये कारंजा लाड तालुक्यातील मोहगव्हाण येथील ५० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. हा व्यक्ती मुंबई येथून परतला आहे. तसेच मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील ६ वर्षीय मुलगा कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले असून तो यापूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३३ झाली असून, यापैकी ३१८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. २०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या