शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांपासून बेपत्ता दोन युवकांचे मृतदेह विहिरीत आढळले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 16:27 IST

रिसोड (वाशिम) - सोमवार, ५ मार्चपासून घरून निघून गेलेल्या रिसोड शहरातील दोन युवकांचे मृतदेह ७ मार्च रोजी दुपारच्या सुमारास रिठद ता.रिसोड येथील शेतशिवारातील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देइकबाल खान (२५) व शेख रेहान (२५) दोघेही रा. रिसोड अशी मृतकांची नावे आहेत.दोघेही ५ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास कुणालाही न सांगता घरून निघून गेले होते. ७ मार्च रोजी मोबाईल लोकेशनवरून ते रिठद शेतशिवारात असल्याचे समजले.

रिसोड (वाशिम) - सोमवार, ५ मार्चपासून घरून निघून गेलेल्या रिसोड शहरातील दोन युवकांचे मृतदेह ७ मार्च रोजी दुपारच्या सुमारास रिठद ता.रिसोड येथील शेतशिवारातील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. इकबाल खान (२५) व शेख रेहान (२५) दोघेही रा. रिसोड अशी मृतकांची नावे आहेत.

 इकबाल खान व शेख रेहान हे दोघेही ५ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास कुणालाही न सांगता घरून निघून गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबियांसह नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ६ मार्च रोजीदेखील शोधाशोध केली. इकबालचा मोबाईल सुरू असल्याने मोबाईल लोकेशनवरून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ७ मार्च रोजी मोबाईल लोकेशनवरून ते रिठद शेतशिवारात असल्याचे समजले. यावरून कुटुंबिय व नातेवाईकांनी रिठद शेतशिवार गाठला असता, एका विहिरीजवळ दोन मुलांचे कपडे पडलेले आहेत, अशी माहिती रिठद येथील काही जणांनी दिली. या माहितीवरून सदर विहिर गाठली असता, सदर कपडे हे इकबान खान व शेख रेहान यांचेच असल्याची ओळख पटली. मदतकार्य करणाºया एका पाणबुड्याने विहिरीत उडी मारून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, एका जणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. काही वेळानंतर दुसºया युवकाचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला. दोन्ही युवकांचे मृतदेह पाहून कुटुंबिय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच वाशिम ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. या घटनेमागील नेमके कारण समजू शकले नाही.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड