शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

म्हशीच्या पोटात निघाले अडीच तोळे सोने; सार्सी येथील प्रकार; शस्त्रक्रियाकरून पोत काढली बाहेर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 21:03 IST

म्हशीने हिरव्या शेंगा सोबत सोन्याची पोथ देखील फस्त केली. तेवढ्यात लक्षात आले की, त्या ताटात सोन्याची पोत ठेवली होती.

वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील सार्सी येथे अजब प्रकार समोर आला आहे. एका म्हशीने चक्क अडीच तोळ्याची पोत खाल्याचे सोनाग्राफीवरुन स्पष्ट झाले. त्यानंतर शस्त्रक्रिया करुन पोत बाहेर काढण्यात पशुवैद्यकीय डॉक्टरांना यश आले. म्हशीवर वाशिम येथे २७ सप्टेंबरला शस्त्रक्रिया करण्यात आली. याबाबतचे व्हिडिओ २९ सप्टेंबरला व्हायरल झाले. 

याबाबत सविस्तर असे की, सार्सी येथील शेतकरी रामहरी भोयर हे शेती करतात. त्यांच्याकडे गुरे, ढोरे आहेत. तसेच एक म्हैस देखील आहे. संध्याकाळी शेतातून घरी येताना ते सोयाबीनला आलेल्या लाल शेंगा घरी घेऊन आले.  त्यांनी या शेंगा घरातल्या महिलांकडे दिल्या. त्यानुसार महिलांनी सोयाबीनच्या शेंगा सोलायला घेतल्या. टरफले ताटात काढून टाकली. त्यानंतर रात्री झोपताना उशा शेजारीच असलेल्या या ताटात गीताबाई भोयर यांनी गळ्यातील सोन्याची पोतही काढून ठेवली. ही पोत जवळपास अडीच तोळ्यांची होती. त्यानंतर सकाळी हेच ताट म्हशीसमोर ठेवण्यात आले. म्हशीने ह्या शेंगा खाता खाता सोन्याचीही पोतही गिळून टाकली. अखेरीस पोत गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर म्हशीवर शस्त्रक्रिया करुन सोन्याची पोत परत मिळवण्यात आली. सोनाग्राफी केली अन् पोत असल्याचे कळलेम्हशीने हिरव्या शेंगा सोबत सोन्याची पोथ देखील फस्त केली.  तेवढ्यात लक्षात आले की, त्या ताटात सोन्याची पोत ठेवली होती. हे बघून घरातील सर्वाची एकच धांदल उडाली. त्यांनी तातडीने डॉ. ज्ञानेश्वर इढोळे यांना कळविले. त्यांनी तातडीने वरिष्ठ डॉक्टरांसोबत संपर्क साधला आणि म्हशीला घेऊन वाशिम येथील जनावराच्या रुग्णालयात पोहचले. मेटल डिटेक्शन वरून म्हशीच्या पोटात काहीतरी असल्याची खात्री करण्यात आली त्यानंतर म्हशीची सोनोग्राफी करून डॉ. बाळासाहेब कौंडिन्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हशीची यशस्वी शस्त्रक्रिया केली व तिच्या पोटातील सोन्याची पोत बाहेर काढली.