शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील बारावीच्या उत्तरपत्रिका अमरावती बोर्डाकडे रवाना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 16:01 IST

बुधवार, १३ मे रोजी जिल्ह्यातील बारावीच्या उत्तरपत्रिका ट्रकव्दारे अमरावती बोर्डाकडे रवाना करण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : इयत्ता बारावीची परीक्षा होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला; मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर जिल्ह्यातील एकाही केंद्रावरील उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अमरावती बोर्डाकडे पाठविणे शक्य झाले नव्हते. दरम्यान, सद्या मिळालेल्या शिथिलतेमुळे बुधवार, १३ मे रोजी जिल्ह्यातील बारावीच्या उत्तरपत्रिका ट्रकव्दारे अमरावती बोर्डाकडे रवाना करण्यात आल्या. यावेळी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक होण्यापूर्वीच सुदैवाने बारावीच्या परीक्षा आटोपल्या होत्या; मात्र त्यानंतर २५ मार्चपासून देशभरासह संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमध्येही संचारबंदी आणि लॉकडाऊन लावण्यात आला. सार्वजनिक वाहतूकीवरही बंदी लादण्यात आली. परिणामी, जिल्ह्यातील केंद्रांवर पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिका तशाच अडकून पडल्या होत्या. आता लॉकडाऊन व संचारबंदीतून बहुतांशी शिथिलता मिळाल्याने अमरावती बोर्डाचे प्रतिनिधी महादेवराव मेहरे व त्यांच्या सहकार्यांनी वाशिमच्या श्री शिवाजी विद्यालयात येऊन तीन विशेष वाहनांव्दारे बारावीच्या सर्व उत्तरपत्रिका सील करून अमरावती बोर्डाकडे रवाना केल्या. यावेळी चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचे दिसून आले. तथापि, उत्तरपत्रिका बोर्डाकडे तपासणीसाठी गेल्याने बारावीचा निकाल देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमexamपरीक्षा