शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तूर, हरभरा दरात घसरण सुरूच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 16:47 IST

वाशिम: जिल्ह्यात तूर आणि हरभरा या शेतमालाच्या दरात सतत घसरण सुरूच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, जिल्ह्यात या शेतमालाची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात तूर आणि हरभरा या शेतमालाच्या दरात सतत घसरण सुरूच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, जिल्ह्यात या शेतमालाची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.जिल्ह्यात गतवेळच्या खरीप हंगामात ७० हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची, तर रब्बी हंगामात ६० हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्रात हरभºयाची पेरणी करण्यात आली होती. अपवादात्मक परिस्थिती आणि डिसेंबरमधील अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान वगळता शेतकºयांना या दोन्ही शेतमालाचे बºयापैकी उत्पादन झाले. तुरीची दोन महिन्यांपासून बाजार समित्यांत आवक सुरू झाली, तर हरभºयाची आवकही गेल्या तीन आठवड्यापासून सुरू झाली आहे. या शेतमालाची आवक बाजारात वाढत असतानाच दरात मात्र घसरण सुरू झाली आहे. शासनाने यंदा ५६७५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव घोषीत केला आहे, तर हरभºयाला ४६२० रुपये प्रति क्विंटलचा दर घोषीत केला असताना जिल्ह्यात या शेतमालाची हमीदरापेक्षा ४०० रुपये कमी दराने खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांत सोमवारी झालेल्या खरेदीनुसार हरभºयाला सरासरी ४२०० रुपये, तर तुरीला ५२०० रुपये प्रति क्विंटलचे दर व्यापाºयांकडून देण्यात आले. त्यात रिसोड बाजार समितीत हरभºयाला ४३०० रुपये, तर तुरीला ५२४० रुपये, मालेगाव बाजार समितीत हरभºयाला ४१५० रुपये , तर तुरीला ५१५० रुपये, मंगरुळपीर बाजार समितीत हरभºयाला ४१४०रुपये , तर तुरीला ५१९० रुपये वाशिम बाजार समितीत हरभºयाला ४२०० रुपये, तर तुरीला ५३०० रुपये प्रति क्विंटल दर व्यापाºयांकडून देण्यात आले. शेतकरी येत्या काही दिवसांत खरीपाच्या तयारीला लागणार असून, रब्बी हंगामात घेतलेल्या उसणवारीसह इतर देणीघेणीचे व्यवहार निकाली काढण्यासाठी शेतकºयाला पैशाची गरज आहे. आता बाजारात अपेक्षीत दर मिळत नसल्याने शेतकरी हताश होत असून, शेतमालाची विक्री करावी, तर नुकसान आणि थांबवावी, तर पंचाईत, अशी अवस्था त्याची झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम