ऑनलाइन लोकम
मालेगाव ( वाशिम ) : ट्रकची समोरासमोर जबर धडक झाल्याने एक चालक जागीच ठार तर दुसऱ्या चालकाचे उपचारादरम्यान निधन झाले. ही दुर्देवी घटना मालेगाव ते अकोला राज्य महामार्गावर ईरळा ते रिधोरा दरम्यान आज दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
अकोला ते मालेगाव या महामार्गावरून आर. जे. ९७ जी.ए.८५५९ क्रमांकाचा ट्रक मालेगावकडे येत होता तर एम.पी. ०९ एच जी -५२५८ क्रमांकाचा ट्रक अकोल्याकडे जात होता. रिधोरा ते ईरळा गावादरम्यान या दोन ट्रकमध्ये समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात एक ट्रक पलटी झाला तर दुसºया ट्रकचा समोरचा एका बाजूचा भाग पुर्णत: चुराडा झाला. एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसºयाचा अकोला येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य एक जण या अपघातात गंभीर जखमी आहे.
या अपघातात महेंद्रसिंग पुर्णारामसिंग (३५) रा. पिंपळगाव बाग ता.जि. झूणझूण (राजस्थान) व त्रिलोचनसिंग अमनदिरसिंग (६२) हे दोघे ठार झाले. जयप्रकाश रामनिवास हे जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत