शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त वाहनाला ट्रकची धडक; वाहनाखाली दबून युवकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 15:38 IST

जखमी अवस्थेत अकोला येथे घेवून जात असतांना झाकीर शहा यांचा रस्त्यातच मृत्यु झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : चार चाकी वाहन नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभे करुन दुरुस्तीचे काम सुरु असताना ट्रकने जबर धडक दिली. यामध्ये बाजुला बसलेल्या १८ वर्षिय झाकीर शहा यांच्या अंगावर चारचाकी वाहन उलटल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाने याचदिवशी सकाळी आपल्या फेसबुकवर ‘मैं दुनिया से चला जाऊं, कभी ना लौटके आऊ, करोगी क्या अकेले तुम, बताओ दिलरुबा ’ हे स्टेटस ठेवले होते. अन रात्री त्याचा मृत्यू झाल्याने त्या युवकाचे आभासी स्टेटस खरे ठरले. या युवकाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.डही वरुन अमरावती येथे भाजीपाला घेवून जाणाºया चारचाकी वाहन एसी क्रं. एम.एच. ०४ इ वाय ८७६५ या वाहनाचे  पाटे तुटले होते. याची दुरुस्ती लाठी येथील गतिरोधकानजीक नांदखेडा येथील १८ वर्षीय आदील अकील शेख करीत होता.  तर रस्त्याच्या बाजूला त्याचा सहकारी १८ वर्षीय झाकीर शहा बसलेला असताना एका सुसाट वेगाने आलेल्या एम.एच. ४९ ए टी १४६० क्रमांकाच्या ट्रकने दुरुस्ती करण्यात येत असलेल्या चारचाकी वाहनाला  मागून जबर धडक दिली. या धडकेत चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. हे वाहन रस्त्याच्या कडेला बसलेल्या झाकीरच्या अंगावर पडले. तर  आदीलचा पाय फॅक्चर झाला. दोघांनाही जखमी अवस्थेत अकोला येथे घेवून जात असतांना झाकीर शहा यांचा रस्त्यातच मृत्यु झाला .  आदीलवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहे. बिट जमादार गब्बर पप्पूवाले, शिपाई गोपाल कव्हर यांनी अपघातग्रस्त वाहनातील शेतकºयांचा भाजीपाला दुसºया वाहनाव्दारे अमरावती बाजारपेठेसाठी रवाना करण्यासाठी मदत केली. परंतु सकाळी ‘मैं दुनिया से चला जाऊं, कभी ना लौटके आऊ’ स्टेटस ठेवणाºया युवकाचा रात्रीच्यावेळी दुर्देवी मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Accidentअपघातwashimवाशिम