शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकरीच बनविणार ‘ट्रायकोकार्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 13:53 IST

मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड असलेल्या गावांतील शेतकºयांना या किडीवर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे शेतकºयांना ट्रायकोकार्ड बनविण्याचे प्रशिक्षण देऊन उद्योजक बनविले जाणार आहे.कपाशी लागवड असलेल्या गावांमधील इच्छुक शेतकºयांची या प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गतवर्षापासून बोंडअळीच्या प्रकोपामुळे शेतकरी धास्तावला असून, या कारणामुळे पुढील काळात कपाशीच्या क्षेत्रात मोठी घट येण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर कृषी विभागाने ‘ट्रायकोकार्ड’ वापराची योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड असलेल्या गावांतील शेतकºयांना या किडीवर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शेतकरी या प्रशिक्षणानंतर ट्रायकोकार्डची निर्मिती करू शकणार आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) वाशिम द्वारा जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचाºयांचें चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा वाशिम दत्तात्रय गावसाने यांनी शेतकºयांना ट्रायकोकार्ड बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आत्माच्यावतीने राज्यांतर्गत शेतकºयांना ट्रायकोकार्ड बनविण्याचे प्रशिक्षण देऊन उद्योजक बनविले जाणार आहे. विशेषकरून बोंडअळी नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड असलेल्या गावांमधील इच्छुक शेतकºयांची या प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. यासाठी इच्छुक शेतकºयांना २९ आॅगस्ट रोजी प्रकल्प संचालक आत्मा वाशिम कार्यालयात आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स व सातबाराची झेरॉक्स वैयक्तिक शैक्षणिक माहितीसह उपस्थित राहावे लागणार आहे. उपस्थित असलेल्या शेतकºयांची निवड प्रशिक्षणासाठी करण्यात येईल. मित्रकिटकापासून (ट्रायकोग्रामा) तयार होणार ट्रायकोकार्ड  ट्रायकोग्रामा हा सूक्ष्म कीटक असून अंडी, अळी, कोष आणि पतंग या ४ अवस्थांमध्ये त्याचा जीवनक्रम पूर्ण होतो. अंडी, अळी आणि कोष या तीनही अवस्था यजमान किडींच्या अंड्यातच पूर्ण होतात. कोषातून बाहेर पडलेला प्रौढ ट्रायकोग्रामा हा सुद्धा अतिशय सूक्ष्म असून, एका टाचणीच्या टोकावर ८ -१० प्रौढ ट्रायकोग्रामा राहू शकतात.  प्रौढ ट्रायकोग्रामा २४ ते २८ तास जगतो. हे किटक तयार करण्यासाठी शेतकºयांना प्रयोगशाळेतून कार्डर्स दिल्या जाणार असून, हे कार्ड दोन दिवसाच्या आत शेतात वापरणे आवश्यक आहे.  हे कार्ड पोस्टकार्ड सारखे असून, एका कार्डवर ट्रायकोग्रामा या मित्रा किटकाची १८,००० ते २०,००० अंडी असतात. या कार्डचे कात्रीने सहा तुकडे करून ते स्टेपलरने पानाच्या खाली अडकवावे लागणार आहे. याबाबत आत्माच्यावतीने तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी