शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बैठकांच्या विषयसूचीत होणार वृक्ष लागवड व संगोपनाची नोंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 14:40 IST

वाशिम - लागवड केलेल्या झाडांचे संरक्षण, देखभाल व संगोपन योग्यरित्या होण्यासाठी आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, आरोग्य विभागाच्या तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय बैठकांमध्ये यापुढे वृक्ष लागवड व संगोपनाशी संबंधित विषय हा विषयसूचीमध्ये समाविष्ठ केला जाणार आहे.

ठळक मुद्दे‘हरित महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत सन २०१७ ते २०१९ या कालावधीत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. वृक्ष संगोपनही होण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाने आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे.

वाशिम - लागवड केलेल्या झाडांचे संरक्षण, देखभाल व संगोपन योग्यरित्या होण्यासाठी आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, आरोग्य विभागाच्या तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय बैठकांमध्ये यापुढे वृक्ष लागवड व संगोपनाशी संबंधित विषय हा विषयसूचीमध्ये समाविष्ठ केला जाणार आहे. तशा सूचनाही सार्वजनिक आरोग्य विभागाने २७ जून रोजी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यात वृक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या पृष्ठभूमीवर राज्यात गत चार वर्षांपासून वृक्षलागवड मोहिम हाती घेण्यात आली आहे. ‘हरित महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत सन २०१७ ते २०१९ या कालावधीत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून, सन २०१७ मध्ये चार  कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली. सन २०१८ मध्ये १३ कोटी आणि २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्याबरोबरच वृक्ष संगोपनही होण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाने आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावरील तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय बैठकांमध्ये वृक्ष लागवड व संगोपन या संदर्भातील विषय हा प्रत्येक बैठकीच्यावेळी विषयसूचीमध्ये स्थायी विषय म्हणून समाविष्ठ केला जाणार आहे. प्रत्येक बैठकीत वृक्ष लागवडीचा आढावा, यापूर्वी लावलेल्या झाडांचे जीवंत राहण्याचे प्रमाण, मृत झाडांच्या जागी नवीन झाडांची लागवड, पुढील वर्षांमध्ये वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाप्रमाणे वृक्षारोपणासाठी स्थळ निश्चिती, रोपांची उपलब्धता, आवश्यक त्या  तांत्रिक पद्धतीने खड्डे तयार करणे, निधीची उपलब्धता आदीसंदर्भात पूर्व यातरीबाबत आढावा घ्यावा लागणार आहे. वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत झालेल्या निर्णयांची नोंद बैठकीच्या इतिवृत्तामध्ये करावी लागणार आहे. क्षेत्रीय कामांना भेटी देतेवेळी त्या-त्या विभागांतर्गत वृक्ष लागवडीच्या स्थळांना भेटी द्याव्या लागणार आहेत तसेच झाडांचे संरक्षण योग्यरितीने होते की नाही, मृत झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावली की नाही, पाण्याची व्यवस्था व संरक्षणासाठी मनुष्यबळ आदी बाबींची वरिष्ठ अधिकाºयांना पाहणी करावी लागणार आहे. 

 वृक्ष लागवड व संगोपन या विषयासंदर्भात शासन व आरोग्य विभागाच्या निर्देश, सुचनांनुसार वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व सहकाºयांच्या सहकार्यातून नियोजन केले जाईल. त्य अनुषंगाने अंमलबजावणीची दिशा ठरविली जाईल.- डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमforestजंगल