रिसोड येथील उपकोषागार कार्यालयात कार्यरत असताना कार्यालयाच्या परिसरात वृक्षप्रेमी मधुकर अंभोरे यांनी जवळपास बारा वर्षांपूर्वी न्यायालयाच्या बाजूकडून वडाची झाले लावली होती, ती केवळ लावलीच नाही तर त्यांचे अतिशय काळजीपूर्वक संवर्धन केले. आज ती वडाची झाडे मोठी झाली असून उन्हाळ्यात आपल्या न्यायालयीन किंवा तहसील संबंधित कामानिमित्त येणारी माणसं त्या झाडाच्या सावलीला बसताना दिसून येत आहेत. झाड लावल्यापासून आजपर्यंत वृक्षप्रेमी मधुकर अंभोरे व त्यांचे सहकारी त्या झाडांचा दरवर्षी वाढदिवस थाटामाटात साजरा करतात. भरउन्हाळ्यात स्वतःच्या पेन्शनच्या रकमेतून टँकरद्वारे पाणीसुद्धा टाकले, कुंपण लावून त्या वृक्षांना त्यांनी जोपासले. या कार्यात त्यांच्या सहचारिणी बेबीनंदा मधुकर अंभोरे आणि निरंकारी सत्संग परिवारातील सदस्यांचे त्यांना नेहमीच सहकार्य मिळते.
वृक्षाचा वाढदिवस व रक्षाबंधन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST