शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जखमी काळविटावर उपचार करुन केले वनविभागास सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 14:03 IST

मंगरुळपीर  : तालुक्यातील मोझरी शिवारात जखमी अवस्थेत शिवाजी परांडे यांच्या शेतात गेल्या दोन दिवसापासून जखमी अवस्थेत असलेल्या अंदाजे सहा ते सात महिन्याच्या काळविटाच्या पाडसावर जखमी अवस्थेत मदत करुन त्यावर उपचार करुन संभाजी ब्रिगेडचे मंगरुळपीर शहराध्यक्ष सचिन  मांढरे यांनी वनविभागाच्या ताब्यात दिले.

ठळक मुद्दे मोझरी गावाशिवारातील शिवाजी परांडे यांच्या शेतात गेल्या दोन दिवसापासून काळविट जखमी अवस्थेत पडलेले होते.शिवाजी परांडे यांच्या ही बाब निदर्शनास येताच , त्यांनी संभाजी ब्रिगेडचे मंगरुळपीर शहराध्यक्ष सचिन उर्फ बाळा मांढरे यांना मोबाइलवरुन या घटनेची माहिती दिली.जखमांवर योग्य उपचार करुन औषधोपचार केल्यामुळे सदर पिलाच्या अंगात बळ येवुन ते सामान्य हालचालीस योग्य झाले.

मंगरुळपीर  : तालुक्यातील मोझरी शिवारात जखमी अवस्थेत शिवाजी परांडे यांच्या शेतात गेल्या दोन दिवसापासून जखमी अवस्थेत असलेल्या अंदाजे सहा ते सात महिन्याच्या काळविटाच्या पाडसावर जखमी अवस्थेत मदत करुन त्यावर उपचार करुन संभाजी ब्रिगेडचे मंगरुळपीर शहराध्यक्ष सचिन  मांढरे यांनी वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.

 मोझरी गावाशिवारातील शिवाजी परांडे यांच्या शेतात गेल्या दोन दिवसापासून काळविट जखमी अवस्थेत पडलेले होते.पाण्यामुळे व्याकुळ होवुन पडलेल्या या पिलात चालण्याचे बळ सुध्दा राहिले नव्हते. त्यामुळे ते निपचित अवस्थेत पडलेले होते. अंगी कोणतेच बळ  न उरल्यामुळे भटकत्या कुत्र्यांनी या पिलाला चावे घेवुन जखमी सुध्दा केलेले होते. शिवाजी परांडे यांच्या ही बाब निदर्शनास येताच , त्यांनी संभाजी ब्रिगेडचे मंगरुळपीर शहराध्यक्ष सचिन उर्फ बाळा मांढरे यांना मोबाइलवरुन या घटनेची माहिती दिली.सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असलेल्या संभाजी ब्रिगेडचे मंगरुळपीर  शहराध्यक्ष सचिन मांढरे यांनी त्यांचे कार्यकर्ते अमोल गादेकर यांच्यासह घटनास्थळावर धाव घेवुन शिवाजी परांडे व अमोल गादेकर यांच्या मदतीने सदर पिलास मंगरुळपीर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. तेथे डॉक्टरांनी काळविटच्या सदर पिलावर उपचार करुन त्यास जीवनदान दिले. जखमांवर योग्य उपचार करुन औषधोपचार केल्यामुळे सदर पिलाच्या अंगात बळ येवुन ते सामान्य हालचालीस योग्य झाले. या घटनेची माहिती वनअधिकारी अविनाश वानखडे याना सुध्दा देण्यात आली. वनअधिकारी अविनाश वानखडे व त्यांच्या पथकाच्या ताब्यात सदर पिलास सोपविले. यावेळी निरज रघवंशी, सुनिल भुतडा, शेषराव तेलंग,  गोटु ठाकुर, तुषार किरसान, यश मानेकर, प्रतिक मानेकर, शुभम भुतडा, शिल्पा मांढरे, नंदनी मांढरे, कल्याणी जगदाळे, मनोज काटकर व शिवरत्न मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर