............
रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी
वाशिम : काजळेश्वर-खेर्डा रस्त्याची दुरवस्था झाली असून, जागाेजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
............
महाशिवरात्री यात्रा प्रथमच रद्द
वाशिम : साेनाळा येथील वाकेश्वर महाराजांची महाशिवरात्री उत्सवानिमित्त यात्रा भरविण्यात येते. यावर्षी काेराेनाचा संसर्ग पाहता, २६ वर्षांत प्रथमच ११ मार्च राेजी होणारी ही यात्रा रद्द करण्यात आली.
..............
सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन
वाशिम : रासायनिक खतांमुळे शेतीचे होणारे नुकसान पाहता, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीमुळे जमीन सुपीक राहात असल्याने सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन मुंगशीराम उपाध्ये यांनी केले.
............
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’बाबत जागृती
वाशिम : महिला व बालकल्याण विभागातर्फे महिला दिनानिमित्त आनलाईन पद्धतीने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’बाबत जनजागृती करण्यात आली.