शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक प्रभावित करणारी वाहने, फेरीवाल्यांना हटविले     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 15:39 IST

१६ एप्रिल रोजी सकाळपासूनच रस्त्यावर उभ्या राहणााºया वाहनांना, फेरीवाल्यांना हटविण्याच्या मोहीमेस प्रारंभ केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  शहरांमध्ये भर रस्त्यावर आॅटो, जड वाहने उभी करुन वाहतूक प्रभावित होत असल्यासंदर्भात लोकमतने १३ व १५ एप्रिल रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची वाशिम शहर वाहतूक शाखेच्यावतिने दखल घेवून १६ एप्रिल रोजी सकाळपासूनच रस्त्यावर उभ्या राहणााºया वाहनांना, फेरीवाल्यांना हटविण्याच्या मोहीमेस प्रारंभ केला आहे. पोलिसांचा ताफा घेवून सदर कारवाई करण्यात आली असून ही कारवाई नियमित ठेवण्याची मागणी होत आहे. १६ एप्रिल रोजी सकाळपासूनच शहर वाहतूक शाखेच्यावतिने ही कारवाई करण्यात आली असली तरी, येथे पुन्हा परिस्थिती जैसे थे होत असल्याने रस्तयावर पुन्हा वाहने उभी राहणार नाही याबाबत वाहतूक शाखेने दक्षता घेण्याची मागणी नागरिकांच्यावतिने केल्या जात आहे.  शहरामध्ये भर रस्त्यांवर आॅटो, जड वाहने उभे राहत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यात पाटणी चौक ते शिवाजी चौकादरम्यान अतिशय रहदारीच्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र संबधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत असल्यासंदर्भात सविस्तर वृतांकन लोकमतच्यावतिने करण्यात आले होते. रस्त्यावर वाहने उभी करण्याचा प्रकार शहरातील काही महत्वाच्या ठिकाणी होत असल्याने  प्रवाशांना , पादचाºयांना व वाहनधारकांना शहरातील अकोला नाका, पुसद नाका, हिंगोली नाका, बसस्थानकचौक विशेषत: शहरातील सर्वात गजबजलेला पाटणी चौक मध्ये फार मोठा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वीही येथे असे प्रकार घडले आहेत. त्यावेळी शहर वाहतूक शाखेने कारवाईही केली आहे. परंतु कारवाईनंतर काही तासातच परिस्थिती पुन्हा जैसे थे होत असल्याने शहर वाहतूक शाखेचा पाहिजे त्या प्रमाणात दबदबा दिसून येत असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. काही महिन्याआधी शहरामध्ये वाहतूक विस्कळीत होवू नये याकरिता पार्कींग व्यवस्था करण्यात आली होती. परंतु व्यापारी व पार्कींग संचालकांमध्ये वाद निर्माण झाल्याने ती संपुष्टात आली. त्यानंतर व्यापाºयांनी पुढाकार घेतल्याने आजच्या घडीला दुचाकी नागरिक व्यवस्थित वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा लावतांना दिसून येत आहे. असे असले तरी रस्त्यावर आॅटोधारक, लघुव्यावसायिक , फेरीवाले बिनधास्तपणे आपला व्यवसाय थाटत आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे. १६ एप्रिलला सकाळपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यावर वाहने, फेरीवाले दिसून न आल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला.  नियमितता आवश्यक!रस्त्यावर उभी राहत असलेल्या वाहनांवर कारवाई नियमित होत नसल्याने एक ते दोन दिवसात परिस्थिती जैसे थे होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही मोहीम नियमित ठेवल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. याकरिता शहर वाहतूक शाखेने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

टॅग्स :washimवाशिमTrafficवाहतूक कोंडी