शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर परिसरातील ‘ट्रान्सफॉर्मर’ कारंजा तालुक्यात हलविले; शेतकरी संतप्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 15:03 IST

शिरपूर जैन (वाशिम) : शिरपूर परिसरातील ‘ट्रान्सफॉर्मर’ कारंजा तालुक्यातील कामरगाव उपकेंद्रात १७ सप्टेंबरला स्थलांतरीत केले

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : शिरपूर परिसरातील ‘ट्रान्सफॉर्मर’ कारंजा तालुक्यातील कामरगाव उपकेंद्रात १७ सप्टेंबरला स्थलांतरीत केले. यामुळे परिसरातील शेतकºयांसह काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, १९ सप्टेंबरला महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना घेराव घातला. मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील ई-क्लास जमिनीवर खंडाळा वीज उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. १७ मे २०१७ रोजी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या उपकेंद्राचे उदघाटन झाले होते. सिंचनासाठी सुरळीत वीजपुरवठा मिळेल, असा विश्वास शेतकºयांमधून वर्तविला जात होता. मात्र, या उपकेंद्रात आवश्यक असलेले खंडाळा, दापूरी खुर्द, शेलगाव या फिडरचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे अगोदरच त्रस्त असलेल्या शेतकºयांना १७ सप्टेंबर रोजी महावितरणने ‘जोर का झटका’ दिला. खंडाळा उपकेंद्रातील ‘ट्रान्सफॉर्मर’ कामरगाव उपकेंद्रात नेण्यात आले. यामुळे शेतकºयांसह काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, महावितरणाचा हा अन्याय कदापिही सहन केला जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका घेत १९ सप्टेंबर रोजी महावितरणच्या शिरपूर येथील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. काँग्रेसचे डॉ. श्याम गाभणे, माजी सरपंच गणेश भालेराव, उपसरपंच असलम गवळी, युवक काँग्रेसचे महासचिव मोहिब खा पठाण, सचिव मयूर भालेराव, नंदकिशोर गोरे यांच्यासह शेतकºयांनी कनिष्ठ अभियंता जाधव यांना घेराव घालण्यात आला. यावेळी महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. खंडाळा उपकेंद्रातून काढून नेण्यात आलेले ‘ट्रान्सफॉर्मर’ त्वरीत परत आणावे अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी संतोष बावीस्कर, दत्तराव जाधव, मारूफखा पठाण, मुख्तार खा पठाण, प्रशांत क्षीरसागर, अमित वाघमारे, सात्विक चोपडे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकºयांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन