शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर पांगरखेडा शिवारात बसविले रोहित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 13:19 IST

लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित करून महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर अखेर शनिवार १५ डिसेंबर रोजी येथे रोहित्र बसविण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम): पांगरखेडा येथील रोहित्र मिर्झापूर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात गेल्याने पांगरखेडासह परिसरातील शेतकºयांना सिंचन करणे कठीण झाले होते. पर्यायी रोहित्रासाठी खांब उभारूनही त्यावर रोहित्र बसविण्याची तसदी घेण्यात येत नव्हती. या संदर्भात लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित करून महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर अखेर शनिवार १५ डिसेंबर रोजी येथे रोहित्र बसविण्यात आले. मालेगाव तालुक्यात नव्यानेच मिर्झापूर प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पांगरखेडा परिसरातील शेतकºयांची मोठ्या प्रमाणात जमिन अधिग्रहित करण्यात आली आणि ती बुडित क्षेत्रात गेली. याच परिसरात शेतकºयांना सिंचन सुविधेसाठी वीज पुरवठ्याच्या उद्देशाने उभारलेले रोहित्रही बुडित क्षेत्रात गेले. त्यामुळे पर्याय म्हणून दुसरे रोहित्र इतर ठिकाणी मंजूर झाले आणि त्यासाठी वीजखांबांची उभारणीही करण्यात आली. तथापि, गेल्या चार महिन्यांपासून या खांबावर नवे रोहित्रच बसविण्यात आले नाही. त्यामुळे पूर्वीच्या रोहित्रावर अवलंबून असलेल्या शेतकºयांना सिंचन करणे अवघड झाले आणि रब्बी हंगामातील पिके संकटात आली होती. लोकमतने या संदर्भात वारंवार वृत्त प्रकाशित करून शेतकºयांच्या समस्येकडे महावितरणचे लक्ष वेधले. अखेर शनिवार १५ डिसेंबर रोजी पांगरखेडा शिवारात पर्यायी रोहित्र बसविण्यात आले. त्यामुळे रब्बी हंगामाती गहू, हरभºयासह भाजीपाला पिकांना पाणी देणे शक्य होणार असल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. 

नियमित वीज पुरवठा देण्याची मागणी पांगरखेडा परिसरातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची पेरणी केली असून, आता नव्यानेच तयार झालेल्या मिर्झापूर प्रकल्पाच्या आधारे शेतकरी भाजीपाला पिकेही घेण्याच्या तयारीत आहेत. अनेक शेतकºयांनी भाजीपाला पिकांची लागवडही केली आहे. या पिकांला पाण्याची मोठी गरज असते. त्यामुळे महावितरणने नव्या रोहित्रावरून शेतकºयांना पुरेसा आणि नियमित वीज पुरवठाही सुरू ठेवावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. 

 

पांगरखेडा येथील रोहित्र मिर्झापूर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात गेल्याने मागील तीन महिन्यांपासून सिंचन करणे कठीण झाले होते. आता या ठिकाणी पर्यायी रोहित्र मिळाल्याने सिंचनाची अडचण दूर होणार आहे. - भगवान शिंदेशेतकरी पांगरखेडा (मालेगाव)

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण