यासंदर्भातील निवेदनात वानखेडे यांनी नमूद केले आहे की, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या निर्देशानुसार मोर्चाचे नियोजन करण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी शेतकरी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष राजू वानखेडे हे सकाळी १० वाजता त्यांच्या अकोला नाका येथील कार्यालयात बसून होते. कोणतीही पूर्वसूचना न देता त्याठिकाणी ठाणेदार बावनकर यांनी येऊन नाहक वाद घातला. त्यानंतर प्रशासनाच्या निर्देशानुसार मोर्चा शांततेत पार पडला. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा ठाणेदार उपस्थित झाले व मोर्चेकऱ्यांना त्यांनी अपमानित केले. चुकीची भाषा वापरून शेतकऱ्यांना धमकावले व दमटाटी केली, असे शंकर वानखेडे यांनी तक्रारीत नमूद केले. त्यामुळे त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी ; अन्यथा वाशिम शहर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही शहराध्यक्ष शंकर वानखेडे यांनी दिला.
वाशिम ठाणेदारांची तत्काळ बदली करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:45 IST