लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभुमिवर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी १८ फेब्रूवारीला दिले.या प्रक्रियेनुसार अधिकारी व कंसात त्यांच्या नेमणूकीचे ठिकाण पुढीलप्रमाणे असणार आहे. रिसोडचे विठ्ठल खुळे (शहर वाहतूक शाखा, वाशिम) वाशिम ग्रामीणचे अनिल मानेकर (वाचक, उपविभागीय अधिकारी कार्यालय, वाशिम) मंगरूळपीर असदखाँ पठाण (जिल्हा वाहतूक शाखा, वाशिम) कारंजाचे रामधन चव्हाण (वाचक, उपविभागीय अधिकारी कार्यालय, मंगरूळपीर) मानोराचे विश्वास वानखेडे (रिसोड), मंगरूळपीरचे राजेश खांदवे (रिसोड), मानोराचे राहुल कातकाडे (शिरपूर), रामबाबु सरोदे (मालेगाव), वाशिम शहरच्या नम्रता राठोड (मालेगाव), गणेश सुर्यवंशी (रिसोड), योगेश धोत्रे (कारंजा), रिसोडच्या सुषमा परांडे (मंगरूळपीर), धनजचे राहुल गुहे (शिरपूर), वाशिम ग्रामीणचे अशोक जायभाये (मालेगाव), मालेगावचे गिरीश तोगरवाड (वाशिम शहर), कारंजा शहरचे योगेश रंधे (मालेगाव) आणि वाशिम शहरचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र नाईक यांची बदली रिसोड पोलिस स्टेशनला झालेली आहे. संबंधितांनी नमूद ठिकाणी विनाविलंब रुजू व्हावे, असे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.
वाशिम जिल्ह्यातील १८ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 15:38 IST