शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी २१ नोव्हेंबरला निवड चाचणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 13:45 IST

वाशिम: अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना पोलीस दलामध्ये नोकरीच्या समान संधी मिळण्याच्या दृष्टीने विनामुल्य भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांची २१ नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलीस मुख्यालय वाशिम येथे निवड चाचणी होणार आहे.

ठळक मुद्देमोफत प्रशिक्षण अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांचा समावेश

वाशिम: अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना पोलीस दलामध्ये नोकरीच्या समान संधी मिळण्याच्या दृष्टीने विनामुल्य भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांची २१ नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलीस मुख्यालय वाशिम येथे निवड चाचणी होणार आहे.प्रशिक्षणासाठी उमेदवार हा अल्पसंख्याक प्रवर्गातील (मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, पारसी आणि जैन) असणे आवश्यक असून प्रशिक्षणार्थींचे वार्षीक कौटुंबिक उत्पन्न रुपये दोन लाख पन्नास हजार रुपयेपेक्षा जास्त नसावे. उमेदवार १८ ते २८ वयोगटातील असावा व इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावा, उमेदवारांची उंची - महिला १५५ सें.मी व पुरुष १६५ सें.मी. छाती- पुरुष- ७९ सें.मी. (फुगवुन ८४ सें.मी.) असणे आवश्यक आहे. उमेदवार शाररीकदृष्टा निरोगी व सक्षम असावा असे अपेक्षीत आहे. उमेदवाराने निवड चाचणीसाठी येताना अर्जासोबत शैक्षणिक अर्हता, रहिवासी दाखला, आधारकार्ड, सेवायोजन कार्यालयाअंतर्गत नाव नोंदणी दाखला यांची सत्यप्रत देणे आवश्यक राहिल. हे प्रशिक्षण दोन महिन्याचे असून दररोज ३ तासाचे प्रशिक्षण वर्ग व २ तासाचे मैदानी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांस दरमहा १५०० रुपये प्रमाणे विद्यावेतन मिळणार आहे. गणवेश साहित्यासाठी रुपये १००० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात चहापान व अल्पोपहार सुध्दा देण्यात येणार आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी २१ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत या कालावधीत वाशिम जिल्हा मुख्यालयाचे पोलीस परेड ग्रांऊडवर विहित अर्ज आणि सर्व कागदपत्राच्या सत्यप्रतीसह निवड चाचणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले.

टॅग्स :Policeपोलिस