शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियमांचे उल्लंघन, ३९ परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 17:04 IST

उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली आणि रस्तासुरक्षा पंधरवड्यांतर्गत ७ मेपर्यंत जिल्हाभरात वाहतूक शाखेच्या सहकार्याने तपासणी मोहिम राबविली आणि विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४१ वाहनचालकांचे परवाने निलंबित केले.

ठळक मुद्देजिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकीसह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याच्या प्रकारांत मोठी वाढ झाली आहे.रस्ता सुरक्षा अभियान वेगाने राबवित ४१ वाहनांवर कारवाई करीत चालकांचे परवाने निलंबित केले. मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा आणि वाशिम येथे ३० एप्रिलपर्यंत तपासणी अभियान राबवून अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी २३ चालकांचे परवाने निलंबित केले.

वाशिम: जिल्ह्यात वाढत असलेली अवैध वाहतूक आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे प्रकार वाढले होते. या प्रकरणी लोकमतने २९ एप्रिलच्या अंकात ’मालवाहू वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली आणि रस्तासुरक्षा पंधरवड्यांतर्गत ७ मेपर्यंत जिल्हाभरात वाहतूक शाखेच्या सहकार्याने तपासणी मोहिम राबविली आणि विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४१ वाहनचालकांचे परवाने निलंबित केले.वाशिम जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकीसह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याच्या प्रकारांत मोठी वाढ झाली आहे. यात क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक, मालवाहू वाहनांतून प्रवासी वाहतूक, परवानाधारकांकडून क्षमता आणि नियमांपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक, वेगाच्या नियमांचे उल्लंघन, फिटनेस टेस्ट न झालेली वाहने चालविणे, हेल्मेट न वापरणे, सिटबेल्ट न लावणे आदि प्रकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू असतानाही हे प्रकार बिनदिक्कत करण्यात येत होते. लोकमतने प्रामुख्याने मालवाहू वाहनांतून होणारी प्रवासी वाहतूक आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतुकीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मालवाहू वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली आणि रस्ता सुरक्षा अभियान वेगाने राबवित ४१ वाहनांवर कारवाई करीत चालकांचे परवाने निलंबित केले. यामध्ये मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा आणि वाशिम येथे ३० एप्रिलपर्यंत तपासणी अभियान राबवून अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी २३ चालकांचे परवाने निलंबित केले. त्याशिवाय जादा मालवाहतूक प्रकरणी मालेगाव येथे ५ परवान्यांचे निलंबन, जादा प्रवासी वाहतूक प्रकरणी वाशिम येथे ३ परवान्यांचे निलंबन, कारंजा, वाशिम येथे सिटबेल्ट न लावता वाहन चालविण्याप्रकरणी ३ परवान्यांचे निलंबन, कारंजा, वाशिम येथे वेग मर्यादा उल्लंघनप्रकरणी २ परवान्यांचे निलंबन, तसेच फिटनेसशिवाय वाहन चालविल्याप्रकरणी ३ परवान्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. सोबतच  मालेगाव येथे विना हेल्मेटप्रकरणी २ चालकांवर कारवाई करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमTrafficवाहतूक कोंडी