शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

 रस्त्यावरील आॅटो, फेरीवाल्यांमुळे वाहतूक प्रभावित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:19 IST

वाशिम :  शहरामध्ये भर रस्त्यांवर आॅटो, जड वाहने उभे राहत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  शहरामध्ये भर रस्त्यांवर आॅटो, जड वाहने उभे राहत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यात पाटणी चौक ते शिवाजी चौकादरम्यान अतिशय रहदारीच्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र संबधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. शहर वाहतूक शाखेच्यावतीेने दररोज शेकडो मोटारसायकलस्वारांवर विविध कारणांवरुन कारवाईची मोहीम राबविण्यात येत असतांना फेरीवाल्यांना आॅटोधारकांनाच का सूट असा प्रश्न निर्माण होत आहे. रस्त्यात आॅटो उभे राहत असल्याने वाहनधारकांना, पादचाºयांना पायी चालणे कठीण झाले आहे. शहर वाहतूक शाखेने अश्या वाहनांवर कारवाई करणे गरजेचे असतांना त्याकडे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.  प्रवाशांना , पादचाºयांना व वाहनधारकांना शहरातील अकोला नाका, पुसद नाका, हिंगोली नाका, बसस्थानकचौक विशेषत: शहरातील सर्वात गजबजलेला पाटणी चौक मध्ये फार मोठा त्रास सहन करावा लागतो. पाटणी चौकामधील दररोजची गर्दी पाहता चौकात तर फेरीवाले , आॅटोवाले किंवा कोणालाही चौकात उभे राहण्याची परवानगी नसावी, आधिच चौक लहान त्यात गर्दीचा सर्वसामान्यांना रोजच त्रास सहन करावा लागतो. त्यात दोन्ही बाजुला आॅटोधारक आपली वाहने उभी करुन वाहतूक विस्कळीत करण्यात हातभार लावतांना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे येथे उभे राहणाºया आॅटोमध्ये अनेक आॅटो खासगी आहेत. ज्यांना केवळ आपल्या सोयीसाठी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. ती आॅटो तेथून बसस्थानक व प्रवासी म्हणेल तेथे नेण्याचे काम करीत आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे भाडे ठरविण्यात आलेले नाही. अव्वाच्या सव्वा भाडे सांगून जनतेची लूट केल्या जात आहे. पर्याय नसल्याने नागरिकांना , प्रवाशांना खिशाला कात्री लागत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक  यांनी विशेष लक्ष देवून शहर वाहतूक शााखेला कडक आदेश करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.  बॉक्स--रस्ता ‘डिव्हायडर’ ठरले अडचणीचे!वाशिम शहरातील पाटणी चौक ते अकोला नाका रस्त्याचे काम नुकतेच झाले. यावेळी रस्त्याच्या मधोमध ‘डिव्हायडर’ नागरिकांच्या सोयीसाठी व आपल्या दिशेने वाहनधारकांनी चालावे यासाठी उभारण्यात आलेत. परंतु हेच डिव्हायडर सोयी कमी नुकसानदायकच जास्त ठरत आहेत. या डिव्हायडरच्या दोन्ही बाजुला लघुव्यावसायिक, फेरीवाले चक्क आपली दुकाने थाटून आधिच अरुंद रस्ता अधिक अरुंद करतांना दिसत आहेत.४ वाशिम शहरात अनेक चौकांमध्ये परमिट नसलेले आॅटो बिनधास्तपणे कुठेही उभे राहत आहेत. वाहतूक शाखेचे कर्मचारी हजर असतांना त्यांच्यावर कारवाई होताना दिसून येत नाही. प्रवासी वाहतुकीचे परमिट नसतांना अनेक वाहने आज शहरातून धावत आहेत.४ वाशिम येथील सर्वात गजबजलेल्या पाटणी चौकात शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी हजर असतात. त्यांच्यासमोर रस्त्यावर वाहने उभी केली जातात परंतु यांना कोणीही हटकतांना दिसून येत नाही. अधिकारीवर्ग आला की, केवळ ‘शो’ केला जात आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला जात आहे. शिवाजी चौकातील गर्दी पाहता दररोज वाहतूक प्रभावित करणाºयांवर कारवाई केली जाते. रस्त्यावर व्यवसाय थाटणाºयांना सूचना करुन कर्मचाºयांना कारवाई करण्याचे सांगण्यात येईल. वाहनधारकांनी आपली वाहने वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी आवाहन करण्यात येईल.-विनायक जाधववाहतूक निरिक्षक, शहर वाहतूक शाख वाशिम

टॅग्स :washimवाशिमTrafficवाहतूक कोंडी