शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वाहनांच्या ‘ब्रेक टेस्ट’साठी वाशिम येथे तयार झाला ‘ट्रॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 13:49 IST

वाशिम: जुन्या वाहनांची ‘ब्रेक टेस्ट’ करून पुन्हा परवाना देण्यासाठी आवश्यक असलेली तपासणी आता जिल्ह्यातच होणार आहे. यासाठी आवश्यक असलेला ट्रॅक वाशिम तालुक्यातील सावरगाव बर्डे येथे तयार करण्यात आला असून, ती येत्या १५ जानेवारीपर्यंत कार्यान्वित होणार आहे.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात आतापर्यंत जुन्या वाहनांची ‘ब्रेक टेस्ट’ करण्यासाठी ट्रॅक नव्हता.येत्या १५ जानेवारीपर्यंत हा ट्रॅक वाहनाच्या तपासणीसाठी सज्ज होणार आहे.जिल्ह्यातील वाहनधारकांना आपल्या वाहनांची तपासणी करून नुतनीकरणासाठी लगतच्या जिल्ह्यात जावे लागत होते.

शिखरचंद बागरेचावाशिम: जुन्या वाहनांची ‘ब्रेक टेस्ट’ करून पुन्हा परवाना देण्यासाठी आवश्यक असलेली तपासणी आता जिल्ह्यातच होणार आहे. यासाठी आवश्यक असलेला ट्रॅक वाशिम तालुक्यातील सावरगाव बर्डे येथे तयार करण्यात आला असून, ती येत्या १५ जानेवारीपर्यंत कार्यान्वित होणार आहे. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून गुरुवारी प्राप्त झाली.राज्यातील २६ जिल्ह्यात जुन्या वाहनांची स्थिती तपासून ती चालविण्यासाठी योग्य आहे की नाही, ते तपासण्यासाठी आवश्यक असलेली ब्रेक टेस्ट ट्रॅकच उपलब्ध नसल्याने या जिल्ह्यातील वाहनधारकांना आपल्या वाहनांची तपासणी करून नुतनीकरणासाठी लगतच्या जिल्ह्यात जावे लागत होते. असा प्रकार १९ वर्षांपूर्वी अस्तित्त्वात आलेल्या वाशिम जिल्ह्यातही सुरू होता. दरम्यान, या प्रकारामुळे वाहनधारकांची होत असलेला त्रास आणि परिवहन विभागाच्या वाढलेल्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने ब्रेक ट्रॅक नसलेल्या २६ जिल्ह्यातील समस्या निकाली काढण्यासाठी परिवहन विभागाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद केली. त्यानुसार वाशिम जिल्ह्याच्या मुख्यालयी वाशिम तालुक्यातील सावरगाव बर्र्डे येथे ही ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ तयार करण्यात आली आहे. ही ट्रॅक २५० मीटर लांब असून, येत्या १५ जानेवारीपर्यंत हा ट्रॅक वाहनाच्या तपासणीसाठी सज्ज होणार आहे. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून गुरुवारी प्राप्त झाली. वाहनांच्या तपासणीची होणार शुटिंगजुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट पूर्वी साध्या पद्धतीने अधिकाºयांच्या उपस्थितीत करण्यात येत होत्या. यामध्ये बरेचदा वाहनांची तपासणी न करताच नुतनीकरण करण्यात येत असल्याचे प्रकारही होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होत्या. यामुळे चालविण्यासाठी योग्य नसलेली वाहने रस्त्यावर धावून अपघातास कारणीभूत ठरत होती. या पृष्ठभूमीवर शासनाने आता जुन्या वाहनांची तपासणी अर्थात ब्रेक टेस्ट कॅमेरा शुटिंगमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी संबंधित सर्वच उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात व्हिडिओ शुटिंग कॅमेरासह इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रक्रि येत वाहनांचे वायपर योग्य आहेत की नाही, वाहनाचे लाईट किती प्रभावी आहे. वाहनाचे स्टिअरिंंग बरोबर आहे की नाही, हे दिसणार आहे. या पद्धतीने तपासणी केलेल्या वाहनांच्याच परवान्यांचेच नुतनीकरण यापुढे केले जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमRto officeआरटीओ ऑफीस