शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा तालुक्यातील शौचालय वाटप घोटाळा पोहचला लोकायुक्त न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 14:03 IST

मानोरा -  मानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या  गट ग्रामपंचायत वापटा व हट्टी येथे सन २०१६  मध्ये शौचालय बांधकामात भ्रष्टाचार प्रकरण आता मुंबई येथे लोकआयुक्त  यांच्या न्यायालयात पोहोचले आहे.

ठळक मुद्देवापटा, हट्टी येथे शौचालय बांधकामात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी पृथ्वीराज राठोड यांनी केली होती.पाच लाभार्थ्यांना अशाच प्रकारचे लाभ अनुदानात एकुण ३०,४०० रुपयाची अनियमितता  आढळुन आली. कारवाई करणेबाबतचा अहवाल सादर करयाचे निर्देश विभागीय आयुक्त अमरावती यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी  यांना पाठविले आहे.

मानोरा -  मानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या  गट ग्रामपंचायत वापटा व हट्टी येथे सन २०१६  मध्ये शौचालय बांधकामात भ्रष्टाचार करणाºया  संबंधीतांविरुध्द  चौकशी करुन कार्यवाही करण्याचे तक्रार  जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे हट्टी येथील पृथ्वीराज राठोड यांनी केली होती. त्यानुसार चौकशी झाली असता शौचालय बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले, मात्र  दोषी सरपंच , ग्रा.पं.चे सचिव यांच्याविरु ध्द कोणत्याच प्रकारची कार्यवाही होत नसल्याने सदर प्रकरण आता मुंबई येथे लोकआयुक्त  यांच्या न्यायालयात पोहोचले आहे.

 तक्रारीनुसार सन २०१६ मध्ये गट ग्रामपंचायत वापटा, हट्टी येथे शौचालय बांधकामात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी पृथ्वीराज राठोड यांनी निवेदनाव्दारे केली होती. तेव्हा मंगरुळपीर पं.स.चे गटविकास अधिकारी यांनी २० जुन २०१६ रोजी चौकशी करुन पाहणी केली असता एकुण लाभार्थ्यापैकी पुंडलीक रामधन चव्हाण यांना ४६०० व विठ्ठल रामधन चव्हाण यांना १२००० हजार रुपायचा अनुदान देण्यात आले. तथापी या दोन्ही लाभार्थ्यांनी शौचालयाचा खड्डा १ व सी २ आहेत व सदर शौचालय एकत्र घरात असल्याचे दिसुन  आल्याचे  चौकशी अधिकाºयाने अहवालात नमुद केले आहे.  नर्मदा विष्णु राठोड या लाभार्थ्यास शौचालय प्रोत्साहन अनुदान रुपये ४६०० अदा करण्यात आले, परंतु चौकशीत शौचालयावर छप्पर आढळुन आले नाहीत. यासह पाच लाभार्थ्यांना अशाच प्रकारचे लाभ अनुदानात अनियमितता आहे. एकुण ३०,४०० रुपयाची अनियमितता  आढळुन आली असल्याने तत्कालीन सरपंच व  कंत्राटी ग्रामसेविका जे.बी.पाटणकर हे अनियमिततेला जबाबदार असुन त्यांचेवर महाराष्ट्र  ग्रामपंचायत अधिनियम १९५९ अंतर्गत क ३९ नुसार कारवाई करणेबाबतचा अहवाल सादर करयाचे निर्देश विभागीय आयुक्त अमरावती यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी  यांना पाठविले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात संबंधीत गैरहजर

सदर प्रकरणाची  दखल विभागीय आयुक्त यांनी घेवुन संबंधीतांना सुनावणीस हजर राहण्याचे  कळविले होते, मात्र संबंधीत दोषी कर्मचारी गैरहजर होते तर तक्रारकर्ता हजर होता. तेव्हा सुनावणी दरम्यान गैरहजर असलेल्या दोषींना तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना  सुनावणीसाठी आता २७ फेबु्रवारी रोजी मुंबई येथे लोक आयुक्त कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

टॅग्स :washimवाशिमCourtन्यायालय