शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

साथरोगाने वाशिम जिल्हा फणफणला; रुग्णालये हाउसफुल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 01:07 IST

वाशिम :  वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात ताप, हिवताप, सर्दी, खोकला, घशाला खवखव आदी साथरोग बळावले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी अज्ञात त्वचारोगाने नागरिक भयभीत आहेत. उपचारार्थ सरकारी रुग्णालयांसह खासगी दवाखान्यांत रुग्णांनी धाव घेतल्याने रुग्णालये हाउसफुल झाल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देअज्ञात त्वचारोगाची भीती कायम

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात ताप, हिवताप, सर्दी, खोकला, घशाला खवखव आदी साथरोग बळावले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी अज्ञात त्वचारोगाने नागरिक भयभीत आहेत. उपचारार्थ सरकारी रुग्णालयांसह खासगी दवाखान्यांत रुग्णांनी धाव घेतल्याने रुग्णालये हाउसफुल झाल्याचे दिसून येते.गत १0 ते १५ दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे.  मध्यंतरी थंडी गायब झाली होती. आता रात्रीच्या सुमारास थंडी वाढल्याने आणि दिवसाचे वातावरण बदलल्याने साथरोग बळावत असल्याचे दिसून येते. बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप,  हिवताप, डोकेदुखी, घशाला खवखव, विषमज्वर आदी आजार नागरिकांना जडत असल्याचे दिसून येते. या विषाणूजन्य तापासोबत लहान मुलांना सर्दी, खोकला व डोकेदुखीने त्रस्त करून सोडले आहे. १५ दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात साधारणत: दररोज २५0 ते ३00 नागरिक विविध आजारांच्या तपासणीसाठी येत होते. आता हा आकडा ५00 ते ५५0 वर पोहोचला असल्याचा दावा डॉक्टरांनी केला. ग्रामीण रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रातही साथरोगाने त्रस्त असलेले रुग्ण उपचारार्थ दाखल होत आहेत. खासगी दवाखान्यातही रुग्णांची गर्दी होत आहे. खासगी दवाखान्यात सरासरी ३0 टक्क्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी सांगितले. लहान बालकांनादेखील सर्दी, ताप व खोकला या आजाराने ग्रासले आहे. वातावरणातील बदलामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचा दावा बालरोग तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

वातावरणातील बदलामुळे साथरोग उद्भवत आहेत. उमरा कापसे येथील त्वचा आजारप्रकरणी आरोग्य विभागाचे पथक पाठविण्यात आले होते. या आजाराचे निदान झाले असून, नागरिकांनी घाबरण्याचे काही कारण नाही. सर्व परिस्थिती नियंत्रणात असून, आरोग्य विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. साथरोगप्रकरणी रुग्णांनी सरकारी दवाखान्यांतील आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा.- डॉ. दीपक सेलोकर,जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल