शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभर प्रतीक्षा करून थकले, अखेर जुने सोयाबीन विक्रीस काढले; आणखी दर घसरण्याची भीती

By नंदकिशोर नारे | Updated: September 19, 2023 15:00 IST

सप्टेंबरअखेर बाजारात वाढली आवक

नंदकिशाेर नारे, वाशिम: गतवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध नैसर्गिक संकटांचा सामना करीत आणि मोठा खर्च करून सोयाबीन पिकविले. तथापि, बाजारात दर पडल्याने आज ना उद्या दर वाढतील, या अपेक्षेने अनेकांनी सोयाबीन साठवून ठेवले. वर्षभर प्रतीक्षा करूनही सोयाबीनचे दर वाढण्याऐवजी कमीच होत गेले. आता पुढे आणखी दर घसरण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवाढीची आशा सोडून जुने सोयाबीन विक्रीस काढले आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेरही जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनची विक्रमी आवक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात गतवर्षी २ लाख ९९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली होती. विविध नैसर्गिक आपत्तीमुळे हे पीक वारंवार संकटात सापडले असताना शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करीत सोयाबीन पिकविले. हे साेयाबीन बाजारात दाखल होत असतानाच दरात घसरण सुरू झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज ना उद्या दर वाढतील या अपेक्षेने सोयाबीन साठवून ठेवले. वर्षभर प्रतीक्षा करूनही दरात वाढ होण्याऐवजी घसरणच होत असल्याने आता शेतकरी निराश झाले आहेत. पुढे दरवाढीची कुठलीच शक्यता दिसत नसल्याने त्यांनी साठवलेले सोयाबीन विक्रीस काढले आहे. त्यामुळे बाजारात सप्टेंबरअखेरही जुन्या सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सोमवारी कारंजा आणि वाशिम येथील बाजार समितीत प्रत्येकी ४ हजार ५०० क्विंटल जुन्याच सोयाबीनची आवक झाली होती.

सणवारामुळेही बाजारात वाढती आवक

आगामी काळात विविध सणवार साजरे होणार आहेत. त्यामुळे बाजार समित्या बंद राहण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना सण उत्सवासह शेतीकामांसाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढत असल्याचेही दिसून येत आहे.

नव्या हंगामाचीही तयारी

सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता मुळीच दिसत नाही. त्यात नवा हंगाम तोंडावर आहे. या हंगामातील पिकलेला माल काढून घरी आणणे, तसेच आवश्यकतेनुसार त्याची साठवणूक करण्याची तयारी शेतकऱ्यांना करावी लागणार असल्यानेही सोयाबीन विक्रीवर त्यांनी भर दिला आहे.

कोणत्या बाजार समितीत किती क्विंटल आवक

  • वाशिम - ४५००
  • कारंजा - ४५००
  • मंगरुळपीर १०००
  • रिसोड - ७००
  • मानोरा - ४००
टॅग्स :washimवाशिम