शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

थकीत कर्जदारांना नव्याने कर्ज मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 12:27 IST

शासन व पालकमंत्र्यांच्या सूचना असतानाही काही बँका नव्याने पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत भर पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणिकरण रखडल्याने जवळपास २८ हजार शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळण्यात अडथळे येत आहेत. शासन व पालकमंत्र्यांच्या सूचना असतानाही काही बँका नव्याने पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत भर पडली.महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपये मर्यादेपर्यंत राज्यातील शेतकºयांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अंमलात आणली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९९ हजार २२३ शेतकरी पात्र ठरले आहेत. शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून आधार प्रमाणिकराची कार्यवाही सुरू केली होती. कर्जखात्यात किती रक्कम थकीत आहे, त्याची शेतकºयांना माहिती देऊन मान्यता घेण्यासाठी आधार प्रमाणिकरण आवश्यक आहे. विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध झालेल्या यादीत नाव असलेल्या शेतकºयांना आपल्या नावासमोरील विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक व बँक पासबुकसह आपले सरकार सेवा केंद्र अथवा संबंधित बँकेत जावून आधार प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर २४ मार्चपासून आधार प्रमाणिकरण प्रक्रिया बंद करण्यात आली. यापूर्वी ७० हजार ९६५ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाल्याने या शेतकºयांना ४५३ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. उर्वरित २८ हजार २५८ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण होउ शकले नसल्याने या शेतकºयांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळू शकला नाही. तथापि, या शेतकºयांना नव्याने पीककर्ज देण्यात यावे, असे निर्देश राज्य शासनाने तसेच पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी यापूर्वीच दिलेले आहेत. असे असतानाही कर्ज थकित असल्याचे कारण समोर करून या शेतकºयांना नव्याने पीककर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँकांची नकारघंंटा कायम आहे. नव्याने पीककर्ज देऊन शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक हुकुम तुर्के यांनी ७ जून रोजी केली.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीCrop Loanपीक कर्ज