शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

गावकऱ्यांच्या एकजुटीतून तपोवन गाव बनले ‘पाणीदार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 11:03 IST

Water Conservation News : पानी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी समस्येवर मात करीत गाव पाणीदार बनविले आहे.

- साहेबराव राठोडलोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार : वॉटरकप स्पर्धेने पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरिकांमध्ये एकजूट निर्माण केली. शासनावर अवलंबून राहण्याचा प्रघात मोडायला शिकवले आणि स्वकष्टाने आपल्या गावाला पाणीदार बनविण्याचा अनुभवही दिला. याच बळावर शेलूबाजार येथून जवळच असलेल्या तपोवन ग्रामवासीयांनी अंतर्गत राजकारणाला फाटा देता एकजुटीने पानी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी समस्येवर मात करीत गाव पाणीदार बनविले आहे.तपोवन हे केवळ १ हजार ६५ लोकवस्तीचे गाव. मात्र येथे ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची असायची. गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शरदराव भानुदास येवले यांची जनतेतून सरपंचपदी निवड झाली. त्यानंतर गावातील अंतर्गत राजकारणाला फाटा देत गावाचा विकास करण्याचा निश्चय केला. २०१८-१९ मध्ये पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला.  ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रमदानातून एकजूट दाखविल्याचा प्रत्यय दिला. मागील वर्षी श्रमदानातून ३ शेततळे निर्माण केले. त्यामुळे गावातील गुराढोरांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली, सोबतच गावातील विहिरी व बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. गावाला पाणीपुरवठा करणार्‍या ग्रामपंचायतचे बोअरवेलमध्ये आता दिवसभर पाणी पुरेल इतका जलसाठा वाढला. पानी फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या श्रमदानास ग्रामस्थांमध्ये चांगलाच उत्साह जाणवला. भारतीय जैन संघटनेकडून पोकलँड मिळाला. यासाठी जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत पोफळकर, शेलूबाजार ग्रा पं उपसरपंच रजनीश कर्नावट तसेच डॉ रिखबचंद कोठारी, मदनभाई येवले यांच्या सहकार्याने गेल्यावर्षी २ व यावर्षी ४ असे ६ किलोमीटर नाला खोलीकरण करण्यात आले. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पुढाकाराने तपोवन गाव जलसमृद्ध बनले आहे. पानी फाउंडेशन समृद्ध गाव स्पर्धेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे, तालुका समन्वयक सुभाष गवई, जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार, पानी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. गाव पाणीदार बनविण्यासाठी गावकरी, शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले. गेल्या दोन वर्षांत गावातील पाणी समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जिल्ह्यातील संबंधित अधिकारी, कर्मचारी व गावातील युवकांचे मोठे सहकार्य लाभले, असे सरपंच शरदराव भानुदास येवले यांनी सांगितले. 

कृषी विभागातर्फे जलसंधारणाची कामेगेल्यावर्षी २५० हेक्टर बांध बंदिस्त डिप सीसीटीची ५६ हेक्टर कामे केली. यंदाही कृषी विभागाकडून गॅबियन बंधारे निर्माण केले. एकाचे काम पूर्ण झाले तर २ प्रगतीपथावर आहे. २५ एलबीएस मंजुर आहेत. १ माती नाला बांध, ५ गावातील युवकांना कृषी विभागाच्यावतीने मधुमक्षिका पालनचे प्रशिक्षण देण्यात आले. त्या प्रशिक्षणावरुन चंद्रकांत येवले यांनी आपल्या शेतात तो प्रयोग यशस्वी केला आहे. कृषी सहाय्यक वर्षा भारती यांनी तपोवन गावाला आवश्यक त्या विविध कामाचे नियोजन केले आहे.

सामाजीक वनिकरण विभागाचेही सहकार्यपाणी फाउंडेशनमध्ये सहभागी तपोवन ग्रामवासीयांना सामजीक वनिकरण विभागाचेही पाठबळ मिळाले. पावसाळ्यापूवीर्चे ई क्लास जमीनीवर २० हेक्टर मध्ये २२ हजार २२० खड्डे १० बाय १० आकारात केले आहेत. यावर्षी नियोजनानुसार वृक्षलागवड करण्यात येणार आहे. पाणी क्षेत्रात पाणी अडविण्यासाठी समतल चर खोदण्यात आले. वृक्षलागवड क्षेत्रामध्ये गुरांपासून संरक्षण मिळावे म्हणून चर खोदले आहे. सदर कामे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर चौधरी यांच्या देखरेखखाली केली.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा