शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादवरून येणार मतदान यंत्रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 13:41 IST

लोकसभा निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाने अधिक दक्षता बाळगण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असून, ‘बॅलेट युनिट’, ‘कंट्रोल युनिट’ आणि ‘व्हीव्हीपॅट’, अशा तीन प्रकारच्या मशीन हैदराबादवरून पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

ठळक मुद्देगामी लोकसभा निवडणूक एप्रिल २०१९ मध्ये होण्याची शक्यता असून त्याची पुर्वतयारी निवडणूक आयोग तद्वतच जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली आहे. ‘बॅलेट युनिट’, ‘कंट्रोल युनिट’ आणि ‘व्हीव्हीपॅट’, अशा तीन प्रकारच्या मशीन हैद्राबादवरून बोलाविण्यात येत आहेत.

- सुनील काकडेवाशिम : देशभरातील विविध राज्यांमध्ये झालेल्या निवडणूक प्रक्रियेत ‘ईव्हीएम मशीन’बाबत बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाने अधिक दक्षता बाळगण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असून, ‘बॅलेट युनिट’, ‘कंट्रोल युनिट’ आणि ‘व्हीव्हीपॅट’, अशा तीन प्रकारच्या मशीन हैदराबादवरून पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुषंगाने २६ जुलै रोजी सदर ‘मशीन’ आणण्याकरिता वाशिममधून विशेष वाहने हैद्राबादकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.सन २०१४ मध्ये ७ एप्रिल ते १२ मे या कालावधीत ५४३ पदांसाठी लोकसभा निवडणूक घेण्यात आली. त्यानुषंगाने आगामी लोकसभा निवडणूक एप्रिल २०१९ मध्ये होण्याची शक्यता असून त्याची पुर्वतयारी निवडणूक आयोग तद्वतच जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली आहे. या निवडणूकीला सामोरे जाताना कुठल्याही तांत्रिक त्रुट्या राहू नये, याची विशेष खबरदारी घेतली जात असून ‘बॅलेट युनिट’, ‘कंट्रोल युनिट’ आणि ‘व्हीव्हीपॅट’, अशा तीन प्रकारच्या मशीन हैद्राबादवरून बोलाविण्यात येत आहेत. सदर मशीन प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेतील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देवून निवडणूक प्रक्रियेसाठी परिपूर्ण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त स्तरावर बैठक!आगामी लोकसभा निवडणूकीला साधारणत: १० महिन्याचा कालावधी शिल्लक असला तरी त्याची पुर्वतयारी जोरासोरात सुरू झाली आहे. त्यानुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यमान सर्व पदाधिकारी व अधिकारी, कर्मचाºयांच्या उपस्थितीत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विभागीय आयुक्त कार्यालयात मोठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात मतदान यंत्रांसह तत्सम बाबींवर उहापोह केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हैदराबादवरून ‘बॅलेट युनिट’, ‘कंट्रोल युनिट’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ अशा तीन प्रकारच्या मशीन आणण्याकरिता वाहने रवाना करण्यात आली आहेत. वाशिम जिल्ह्यात १०४० मतदान केंद्र असून आवश्यक प्रमाणात मशीन मागविण्यात आल्या आहेत.- शैलेष हिंगे,निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

 

टॅग्स :Electionनिवडणूकwashimवाशिम