शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तीनवेळा मुदतवाढ मिळूनही विसावी पशुगणना अपूर्णच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 17:16 IST

प्रक्रिया पूर्ण करण्यास त्यानंतर ३१ मार्च २०१९, ३० एप्रिल २०१९ आणि १० जून २०१९ अशी तीनवेळा मुदतवाढ देण्यात येवूनही प्रक्रिया अद्याप अपूर्णच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आॅक्टोबर २०१८ पासून सुरू करण्यात आलेली विसावी पशुगणना प्रक्रिया पूर्ण करण्यास डिसेंबर २०१८ ची मुदत देण्यात आली होती; मात्र सुरूवातीच्याच टप्प्यात अपयशी ठरलेल्या यंत्रणेस प्रक्रिया पूर्ण करण्यास त्यानंतर ३१ मार्च २०१९, ३० एप्रिल २०१९ आणि १० जून २०१९ अशी तीनवेळा मुदतवाढ देण्यात येवूनही प्रक्रिया अद्याप अपूर्णच आहे. दिल्लीतील मुख्य सर्व्हर आणि प्रगणकांना दिलेल्या टॅबमध्ये उद्भवणारे तांत्रीक बिघाड, टॅबमधील अनेकवेळा बदललेले वर्जन या कारणांमुळेच हा प्रकार घडल्याची माहिती प्राप्त झाली.महाराष्ट्रात सन २०१२ मध्ये १९ वी पशुगणना करण्यात आली होती. त्यापुढील पाच वर्षानंतर अर्थात २०१७ मध्ये विसाव्या पशुगणनेचे काम सुरू होणे क्रमप्राप्त होते. प्रत्यक्षात मात्र हे काम आॅक्टोबर २०१८ मध्ये हाती घेण्यात आले. बदललेल्या कार्यप्रणालीनुसार पशुगणना करण्यासाठी राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये प्रगणकांची नियुक्ती करून त्यांना ‘टॅब’ पुरविण्यात आले. त्यात आधी २.० वर्जन टाकण्यात आले. यामाध्यमातून पशुपालकांच्या घरी जावून त्यांच्याकडील जनावरांची माहिती आॅनलाईन, आॅफलाईन पद्धतीने आधी ‘टॅब’मध्ये आणि नंतर दिल्लीतील मुख्य सर्व्हरकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या; मात्र २.० हे वर्जन प्रगणकांसाठी त्रासदायक ठरू लागल्याने त्यात बदल करून ३.० चे वर्जन टॅबमध्ये टाकण्यात आले. त्याऊपरही पशुगणनेच्या कामाला गती मिळाली नाही. दरम्यान, निर्धारित मुदतीत प्रक्रिया पूर्ण न झाल्याने केंद्रशासनाने तीनवेळा मुदतवाढ दिली; मात्र १० जून २०१९ या अंतीम मुदतीपर्यंतही पशुगणनेचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.आकडेवारीबाबत पशुसंवर्धन विभाग अनभिज्ञआॅक्टोबर २०१८ पासून सुरू झालेली पशुगणना ९ महिन्याच्या मोठ्या कालावधीतही पूर्ण होवू शकलेली नाही. प्रगणकांनी गोळा केलेली माहिती मुख्य सर्व्हरकडे पाठविली; मात्र त्यात विविध स्वरूपातील त्रुटी असून ही प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. यामुळे राज्यातील जिल्ह्यांमध्ये नेमकी किती जनावरे आहेत, याबाबत पशुसंवर्धन विभागच अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.  पशुगणना करण्यासाठी नेमलेल्या प्रगणकांच्या माध्यमातून पशुपालकांकडील जनावरांची माहिती गोळा करून वरिष्ठ स्तरावर पाठविली आहे; मात्र प्रक्रिया पूर्ण होवून नेमकी आकडेवारी हाती यायला आणखी विलंब लागणार आहे.- भुवनेश बोरकरजिल्हा पशुसंवर्धन आयुक्त, वाशिम

टॅग्स :washimवाशिम