शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममार्गे आणखी धावणार तीन रेल्वेगाड्या!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 18:37 IST

Indian Railway News वाशिममार्गे आणखी तीन रेल्वेगाड्या धावणार आहेत.

वाशिम : अनलॉकच्या टप्प्यात दळणवळणासाठी रेल्वे, बसेसची संख्या वाढविण्यात येत असून, वाशिममार्गे आणखी तीन रेल्वेगाड्या धावणार आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.देशांतर्गत दळणवळणाच्या दृष्टिकोनातून वाशिम येथे फारशा सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अकोला येथील रेल्वे स्थानक गाठावे लागते. काही रेल्वे गाड्या वाशिममार्गे धावत असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना थोडा दिलासा मिळत आहे. यापूर्वी हैदराबाद -जयपूर, जयपूर-हैदराबाद, तिरुपती-अमरावती, अमरावती ते तिरुपती या रेल्वेगाड्या सुरू आहेत. आता आणखी तीन रेल्वेगाड्या वाशिममार्गे धावणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. दक्षिण-मध्य रेल्वे हुजूर साहिब नांदेड-श्रीगंगानगर, श्रीगंगानगर-नांदेड, सिकंदराबाद-जयपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे सुरू केल्या. या तिन्ही विशेष रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. हुजूर साहिब नांदेड-श्रीगंगानगर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ही २७ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०२१  दरम्यान दर रविवारी सकाळी ११.०५ वाजता नांदेड येथून सुटेल आणि हिंगोली, वाशिम, अकोला, नवी दिल्ली, भटिंडामार्गे रात्री ८.१५ वाजता श्रीगंगानगर येथे पोहोचेल. श्रीगंगानगर-नांदेड साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २५ डिसेंबर ते २९ जानेवारी २०२१ दरम्यान दर शुक्रवारी दुपारी १३.२५ वाजता श्रीगंगानगर येथून सुटेल आणि हनुमानगढ, भटिंडा, नवी दिल्ली, अकोला, वाशिम, हिंगोलीमार्गे रात्री ९.४० वाजता नांदेड येथे पोहोचेल. नांदेड ते श्रीगंगानगर विशेष द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस २४ डिसेंबर  ते १ फेब्रुवारी २०२१ दरम्यान दर सोमवारी आणि गुरुवारी सकाळी ११.०५ वाजता नांदेड येथून सुटेल आणि हिंगोली, वाशिम, अकोला, नवी दिल्ली, भटिंडामार्गे रात्री ७ वाजता श्रीगंगानगर येथे पोहोचेल. श्रीगंगानगर-नांदेड द्विसाप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २२  डिसेंबर ते ३० जानेवारी २०२१ दरम्यान दर  मंगळवार आणि शनिवारी दुपारी २.४५  वाजता श्रीगंगानगर येथून सुटेल आणि भटिंडा, नवी दिल्ली, अकोला, वाशिम, हिंगोलीमार्गे रात्री ९.४० वाजता नांदेड येथे पोहोचेल. सिकंदराबाद-जयपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २८ डिसेंबर ते १ फेब्रुवारी २०२१ दरम्यान दर सोमवारी सिकंदराबाद येथून रात्री ९.४० वाजता सुटेल आणि नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, भोपाल, उज्जैन, कोटामार्गे जयपूर येथे सकाळी ६.४५ वाजता पोहोचेल. जयपूर-सिकंदराबाद साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २६ डिसेंबर ते ३० जानेवारी २०२१  दरम्यान दर शनिवारी जयपूर येथून रात्री १०.३५ वाजता सुटेल आणि कोटा, उज्जैन, भोपाल, अकोला

टॅग्स :washimवाशिमIndian Railwayभारतीय रेल्वे