शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक नुकसान व जीवे मारण्याची धमकी देणा-यास तीन महिन्यांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 22:08 IST

दुकानातील साहित्याची फेकफाक करून दोन हजार रुपयांचे नुकसान करीत, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगरुळपीर येथील न्यायालयाने आरोपीला संयुक्त अडिच हजार रुपये दंड आणि तीन महिने कारवासाची शिक्षा ८ डिसेंबर रोजी सुनावली, तसेच दोन कलमांतील दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त प्रत्येकी ३० दिवसांच्या कारावासाची शिक्षाही सुनावली आहे.

ठळक मुद्देमंगरुळपीर येथील प्रकरणआरोपीविरोधातील गुन्हा सिद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: फिर्यादीच्या दुकानातील साहित्याची फेकफाक करून दोन हजार रुपयांचे नुकसान करीत, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगरुळपीर येथील न्यायालयाने आरोपीला संयुक्त अडिच हजार रुपये दंड आणि तीन महिने कारवासाची शिक्षा ८ डिसेंबर रोजी सुनावली, तसेच दोन कलमांतील दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त प्रत्येकी ३० दिवसांच्या कारावासाची शिक्षाही सुनावली आहे. मंगरुळपीर शहरातील डिसेंबर २०१४ च्या प्रकरणात दिवाणी व फौजदारी न्यायालयाने हा निकाल दिला आहे. मंगरुळपीर शहरातील पंचशील नगरातील रहिवासी फिर्यादी ज्ञानदेव तुकाराम भगत याने २३ डिसेंबर २०१४ रोजी पोलीस स्टेशन. मंगरुळपीर येथे फिर्याद दिली होती की, आरोपी भुपेंद्र शंकर राऊत  रा.शेलगाव ता.मंगरुळपीर याने फिर्यादीच्या कटलरीचे दुकानात जाऊन हे दुकान खाली कर, असे म्हणत दुकानातील साहित्याची फेकफाक करुन २००० रुपयांचे नुकसान केले व जीवाने मारुन टाकीन अशी धमकी दिली होती. या फिर्यादीवरून मंगरुळपीर पोलिसांत आरोपीविरोधात अप नं. ३२४/१४ कलम ४२७,४४७,५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुर्यकांत परळकर यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयाल दोषारोपपत्र दाखल केल होते. या प्रकरणी साक्ष पुराव्याच्या आधारे आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध होत असल्याने न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मंगरुळपीर एम.आर.पनाड यांनी कलम ४२७/४४७, ५०६ भादंविनुसार आरोपीस दोषी धरून सदर गुन्ह्यासाठी कलम ४२७ नुसार ३ महिने कारवासाची शिक्षा व १००० रु दंड, कलम ४४७ नुसार ५०० रु दंड, दंड न भरल्यास ३० दिवसांच्या कारवासाची शिक्षा, कलम ५०६ नुसार १०००दंड, दंड न भरल्यास ३० दिवस कारवासाची शिक्षा सुनावली.

सदर प्रकरणात तपास अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पारणकर, सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून अब्दुल मतीन यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून उत्तम गोलाम व हमिद भुरीवाले यांनी काम पाहिले. 

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हा