शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
3
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
4
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
5
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
6
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
8
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
9
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
10
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
11
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
12
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
13
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
14
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
15
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
16
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
17
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
18
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
19
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
20
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...

वाशिम जिल्हा रुग्णालयात वर्षभरात तीन मातामृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 11:47 IST

Washim District Hospital वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षभरात तीन मातांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

वाशिम :  गरोदरपण व बाळंतपणात मातामृत्यूचे प्रमाण रोखण्याकरिता आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात बहुतांशी यशदेखील मिळत आहे; मात्र गंभीर अवस्थेत मृत्यू टाळता येणे अशक्य ठरत असल्याचे दिसत आहे. वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षभरात तीन मातांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गरोदर असताना किंवा प्रसूतीच्या वेळी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्याबाबत जागृती नसणे, रुग्णालयात नेत असताना वाहनाची सोय नसणे आणि रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होणे, रुग्णालयात गेल्यानंतर उपचारास विलंब लागणे, तयारी नसणे किंवा रक्त, शस्त्रक्रियेची वेळेवर सुविधा न मिळणे, ही मातामृत्यूची कारणे असून गरोदरपणात, गर्भपात करतेवेळी किंवा बाळंतपणात रक्तस्राव होणे, जंतूदोषामुळे शरीरात गंभीर आजार होणे, अडलेले बाळंतपण, झटके, अतिरक्तदाब, गर्भपात, दूषित गर्भपात, हिवताप, रक्तपांढरी या कारणांमुळेही मातामृत्यू होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. दरम्यान, वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २०२० या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत २,१९३ महिलांची प्रसूती झाली. त्यात १७४ महिलांचे सीझरचे तर २,०१९ महिलांची नॉर्मल डिलिव्हरी झाली. त्यात तीन मातांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली. जिल्हा सामान्य रुग्णालयात गरोदरपणात प्रसुतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांची विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी आहे. 

ऑक्टोबरमध्ये  सर्वाधिक प्रसूती   गतवर्षी ऑक्टोबर २०२० या महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वाधिक २७९ महिलांची प्रसूती झाली. त्यात १८ महिलांचे सीझर तर २६१ महिलांची नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आली. या महिन्यात  महिलेचा मृत्यू झाला. 

माता मृत्यूसाठी रक्तदाब, रक्तस्त्राव प्रमुख कारणमाता मृत्यूमध्ये अधिक किंवा अत्यंत कमी रक्तदाब असणे, प्रसूतीदरम्यान अधिक रक्तस्त्राव होणे ही कारणे प्रमुख मानली जात आहेत. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यादृष्टीने व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे.

 एप्रिल ते डिसेंबर २०२० या नऊ महिन्यात प्रसूतीकरिता एकूण २,१९३ महिला रुग्णालयात दाखल झाल्या. त्यातील २,१९० महिलांची प्रसूती सुरक्षितरीत्या झाली. मात्र दोन महिला बाहेरूनच गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाल्या होत्या तर एका महिलेला अधिक रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला.- डॉ. मधुकर राठोड, सीएस, वाशिम

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल