शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांकडे तीन कोटी रुपये थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 16:07 IST

वाशिम :  नगर परिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. वाशिम नगर परिषदेचा ३ कोटी रुपयांचा कर शासकीय कार्यालयांकडे थकीत आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  नगर परिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. वाशिम नगर परिषदेचा ३ कोटी रुपयांचा कर शासकीय कार्यालयांकडे थकीत आहे.  १९ डिसेंबरपर्यंत शासकीय कर वगळता नगरपरिषदेच्या कर विभागाने ४ कोटी रुपये कराची वसुली केली आहे.वाशिम नगरपरिषद क्षेत्राअंतर्गंत अनेकांकडे कराचा भरणा बाकी असल्याने जे वेळेच्या आत थकबाकीदार थकबाकी भरणार नाहीत अशा थकीतधारकांना जप्तीच्या नोटीसा देण्यात येणार आहेत. जिल्हयातील चारही नगरपरिषदेच्यावतीने करवसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे यामध्ये  जिल्हयातील चारही नगरपालीकेत सर्वाधिक करवसुली वाशिम नगरपरिषदेने केली आहे. गतवर्षी सुध्दा ३१ मार्च २०१८ अखेरपर्यंत वाशिम नगरपरिषदेच्या करविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी कसोशिने प्रयत्न केल्याने ९   कोटी रुपयांची  करवसुली करुन दाखविली होती. याहीवेळी मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के वसुली करण्याचा मानस मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी व्यक्त केला असून त्यासाठी करनिरिक्षक अ.अजीज अ. सत्तार, करसंग्राहक प्रयत्नशिल आहेत. वाशिम नगरपरिषदेच्यावतिने शंभर टक्के वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली असून कर भरणा करण्याचे आवाहन करण्यासाठी मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच एक पथक कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच जप्तीच्या नोटीस सुध्दा थकीत करधारकांना देण्यात येणार आहेत. थकीत कर वसुलीसाठी मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरिक्षक अ. अजिज अ. सत्तार यांच्या पुढाकारात करसंग्राहक साहेबराव उगले, संतोष किरळकर, शिवाजी इंगळे, के.आर. हडपकर, नाजिमोद्दिन मुल्लाजी, मुन्ना खान, दत्ता देशपांडे, रमजान बेनिवाले, संजय काष्टे परिश्रम घेत आहेत.

वाशिम नगरपरिषदेच्यावतिने १०० टक्के करवसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना सुध्दा कर विभागाला देण्यात आल्या असून नागरिकांनी कर भरुन सहकार्य करावे. कर भरणा न करणाºयांच्या घरी, प्रतिष्ठानवर तयार करण्यात येणार असलेले पथक पाठविण्यात येणार आहे. तसेच जप्तीच्या नोटीस सुध्दा पाठविण्यात येणार आहेत. या कारवाईपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी कर भरणा करावा व शहर विकासाला हातभार लावावा. करवसुलीसाठी कर विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी मोहीम राबविणे सुरु केली आहे.- वसंत इंगोलेमुख्याधिकारी, वाशिम नगरपरिषद

मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली करवसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. दररोज कामाचा आढावा मुख्याधिकारी यांचेकडून घेण्यात येत असल्याने व त्यांचेही मोलाचे सहकार्य लाभत असल्याने १०० टक्के करवसुली नक्की होणार.- अ.अजिज अ. सत्तारकर निरिक्षक, वाशिम नगरपरिषद

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका