मालेगाव (जि. बुलडाणा): शहरातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ३0 मे रोजी रखरखत्या उन्हातच नगपंचायतच्या विरोधी गटाच्या नगरसेवकांनी आयोजित घागर मोर्चा काढला. यामध्ये सकाळी ११ वाजतापासून जुन्या बसस्थानक परिसरातून शहरा तील महिला भगिनी शेकडोच्या संख्येने हातात पाण्याचे रिकामे भांडे घेऊन सहभागी होत्या. नगर पंचायतचे नगरसेवक चंदू जाधव, सरला जाधव, सुषमा अमोल सोनोने, अमोल सोनोने, रामदास बळी, संतोष सुरडकर, भाजपाचे नगरसेवक किशोर गंगाधर महाकाळ व शिवसेनेचे देवा राऊत यांची प्रामुख्याने उपस्थितीत मोर्चात घागर मोर्चा जुने बसस् थानकावरून नगर पंचायतमध्ये गेला व तेथून तहसील कार्यालयावर महिलांचा घागर मोर्चा धडकला. सत्ताधारी नगरसेवकांवर रोष व्यक्त करीत शहारतील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अपयशी ठरण्याचा आरोप करीत जिल्हा प्रशासनाने शहराला रखरखत्या उन्हातच महिला घागर मोर्चात सहभागी होत्या यावेळी नगरपंचायतमध्ये महिलांनी ह्यपाणी द्या, पाणी द्याह्ण असे नारे लावून खापराचे भांडे फोडले, त्यानंतर सरळ मोर्चा तहसीलकडे वळला तेथे तहसीलदार सोनाली मेटकरी यांना रीतसर निवेदन देउन पाणी टँकर तत्काळ सुरू करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त चोख होता. मोर्चात वृद्ध महिलांसह भरगच्च महिलांचा उपस्थितीत घागर मोर्चा तहसीलवर धडकला शिवसंग्रम, शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांचा सहभाग घागर मोर्चात होता.
पाण्यासाठी हजारो महिलांचा घागर मोर्चा
By admin | Updated: May 31, 2016 02:01 IST