शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

हजारो दिव्यांनी झगमगला ऐतिहासिक देवतलाव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 15:23 IST

वाशिम: शहरातील ऐतिहासिक देवतलाव गुरुवारी रात्री हजारो दिव्यांनी झगमगल्याचे विहंगम चित्र वाशिमकरांना पाहायला मिळाले

ठळक मुद्दे ‘मी वाशिमकर’ संघटनेने देवतलाव महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवांतर्गतच विश्वमांगल्य सभेच्या महिलांनी देवतलावाच्या चारही बाजूला दिव्यांची आरास लावली होती.  हजारो दिव्यांच्या प्रकाशामुळे झगमगलेल्या या तलावाचे रुप नजरेत भरणारे होते. १

वाशिम: शहरातील ऐतिहासिक देवतलाव गुरुवारी रात्री हजारो दिव्यांनी झगमगल्याचे विहंगम चित्र वाशिमकरांना पाहायला मिळाले. या तलावाच्या पुनरुज्जीवन कार्यात हजारो लोक सहभागी होत आहेत. या कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी ‘मी वाशिमकर’ संघटनेने देवतलाव महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवांतर्गतच विश्वमांगल्य सभेच्या महिलांनी देवतलावाच्या चारही बाजूला दिव्यांची आरास लावली होती. वाशिमकरांचे आराध्य दैवत श्री बालासाहेब संस्थाननजिक असलेल्या देव तलावाच्या स्वच्छता आणि गाळ उपसण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला असून, ‘मी वाशिमकर’ संघटनेतर्फे देवतलाव महोत्सवाला १६ मे पासुन प्रारंभ झाला २० मेपर्यंत विविध कार्यक्रम पार पडणार आहे. वाशिमचा देव तलाव श्री बालासाहेब मंदिराचे निर्माणाच्या वेळीच बांधला गेला होता. हा तलाव वाशिमकरांसाठी  ऐतिहासिक तलाव असून, गेल्या कित्येक वर्षांपासून वाशिमकरांच्या पाण्याच्या गरजा भागवित आहे. तथापि, गेल्या काही वर्षांपासून या ऐतिहासिक तलावाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तलाव अगदी कोरडा पडला होता. त्यामुळे भूजल पातळीवर परिणाम झाला आणि त्याची जाणीव वाशिमकरांना होऊ लागली. ही समस्या लक्षात घेऊन मी वाशिमकर संघटनेने या तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी तलावाच्या पुनरुज्जीवनात सहकार्य करण्यासाठी तमाम वाशिमकरांना हाक दिली आणि त्यांच्या हाकेला हजारो नागरिकांनी प्रतिसाद दिला. नागरिकांचा उस्फूर्त सहभाग आणि तलावाच्या झपाटून होत असलेल्या कामाचा उत्सव म्हणून ‘मी वाशिमकर’ संघटनेच्यावतीने देवतलाव महोत्सवाला १६ मे रोजी प्रारंभ करण्यात आला. या महोत्सवात विश्वमांगल्य सभेच्या महिलांनी सहभाग घेऊन देवतलावाच्या पुनरुज्जीवनासाठी श्रमदान केलेच शिवाय देव तलावाच्या घाटावर रात्रीच्यावेळी हजारो दिव्यांची आरासच मांडली. हजारो दिव्यांच्या प्रकाशामुळे झगमगलेल्या या तलावाचे रुप नजरेत भरणारे होते. १६ मे पासून प्रारंभ झालेल्या अधिकमासाचे स्वागत म्हणून  हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विश्वमांगल्य सभेच्या समस्त महिला उपस्थित होत्या. सर्व महिलांनी देव तलावावर सुरू असलेल्या आरतीमध्येही सहभाग घेतला.

टॅग्स :washimवाशिमcultureसांस्कृतिक