शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

वाशिमात हजारो अनुयायांनी केलं महामानवाला अभिवादन, पहाटेच्या सुमारास ‘कॅन्डल मार्च’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 14:58 IST

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारो अनुयायांनी वाशिम जिल्ह्यात बाबासाहेबांना अभिवादन केले.

वाशिम - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारो अनुयायांनी वाशिम जिल्ह्यात बाबासाहेबांना अभिवादन केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी वाशिम येथे सकाळी ५.३० वाजता स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ‘कॅन्डल मार्च’ व अभिवादन कार्यक्रम पार पडला. पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास शहराच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव व आंबेडकरी अनुयायी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र आले. प्रत्येकजण हातात ‘कॅण्डल’ घेऊन चौकात आल्यानंतर महामानवाच्या पुतळ्याजवळ चारही बाजूने गोलाकार स्थितीत ‘कॅण्डल’ लावण्यात आली. त्यानंतर सामुहिक बुद्धवंदना घेऊन पंचशील, त्रिशरण ग्रहण करण्यात आले. भन्ते प्रज्ञापाल यांच्यावतीने भीमस्तूती, धम्मपालन गाथा व सामूहिक वंदना घेतली. यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल अ‍ॅक्टिवा फोरम, संघमित्रा धम्मसेवा महिला मंडळ, मंगलमैत्री महिला मंडळ, जम्बु दीप संघ, डॉ बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटना, पंचशील संघ, भीम टायगर संघटना यांच्यासह विविध सामाजिक संघटना, विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आंबेडकरी अनुयायी व समाजबांधवांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.