शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

परजिल्ह्यातून परतणाऱ्यांना राहावे लागणार २० दिवस घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 10:24 IST

परजिल्ह्यात गेल्यानंतर, परत स्वजिल्ह्यात येणाऱ्यांना आता पुढील २० दिवस घरातच राहावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. अत्यावश्यक कामासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी रितसर परवानगी घेऊन परजिल्ह्यात गेल्यानंतर, परत स्वजिल्ह्यात येणाऱ्यांना आता पुढील २० दिवस घरातच राहावे लागणार आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांविरूद्ध कडक कारवाई होणार आहे; याशिवाय तालुका किंवा जिल्हास्तरावर आयसोलेशन कक्षात २० दिवसात संबंधितांना भरती केले जाणार आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या राज्यात दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येते. वाशिम जिल्ह्यात एका रुग्णाचा अपवाद वगळता तुर्तास तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि, संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे तर काही प्र्रतिबंधात्मक उपाययोजना नव्याने अंमलात आणल्या जात आहेत. अत्यावश्यक कामासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी परजिल्ह्यात जाण्यापूर्वी पोलीस अधीक्षकांची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. या परवानगीनंतर रितसर प्रवास पास, त्यावर नमूद कारण आणि व्यक्तींची संख्या, ठिकाणाचे नाव राहणार असून, त्याची एक प्रत संबंधित तालुक्याचे तहसिलदार आणि आरोग्य अधिकाºयांकडे दिली जाणार आहे. या व्यक्तींवर तालुका प्रशासन आणि आरोग्य विभागाचा वॉच राहणार आहे. परजिल्ह्यात जाणे आणि परजिल्ह्यातून स्वजिल्ह्यात परतल्यानंतर संबंधितांना पुढील २० दिवस घरातच विलगीकरण म्हणून राहावे लागणार आहे. या २० दिवसात संबंधित इसम हा घराबाहेर फिरताना दिसला तर साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करणे आणि तालुका किंवा जिल्हास्तरावर आयसोलेशन कक्षात २० दिवसात त्याला भरती केले जाणार आहे.

तहसिलदार, आरोग्य अधिकाºयांचा वॉच

अत्यावश्यक काम तसेच वैद्यकीय उपचारासाठी परजिल्ह्यात गेल्यानंतर परत स्वजिल्ह्यात आल्यानंतर संबंधितांवर तहसिलदार तसेच तालुका आरोग्य अधिकाºयांचे २० दिवस विशेष लक्ष राहणार आहे. परजिल्ह्यातून स्वजिल्ह्यात आल्यानंतर सर्व संबंधितांची आरोग्य विभागातर्फे प्राथमिक स्वरुपात तपासणी केली जाते. संबंधित इसमांच्या हातावर ‘होम क्वारेंटीन’चे शिक्के मारले जातात. २० दिवस संबंधित नागरिकांचे त्याच्या घरातच विलगीकरण केले जाते. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाणार आहे.शासकीय इमारतीत पर्यायी व्यवस्था

दरम्यान, विनापरवानगी जिल्ह्यातील कोणत्याही गावात परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींपासून कोरोना विषाणू संसर्गाचा धोका टाळण्यासाठी त्या व्यक्तीची राहण्याची व्यवस्था ही संबंधित गावातील जिल्हा परिषदेची शाळा किंवा अन्य शासकीय इमारतीत केली जाणार आहे. यासाठी पांघरून, पिण्याचे व वापरण्याचे पाणी, भोजनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहणार आहे. शाळेत वीज, स्वच्छता, वापरण्याचे पाणी याबाबतची व्यवस्था संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना करावी लागणार आहे.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या