कारंजा लाड (जि. वाशिम): इंटरनेटवरील वेळापत्रक व परीक्षा केंद्रावरील घोळामुळे बारावीच्या विविध पेपरपासून वंचित झालेल्या राज्यातील ३१२ विद्यार्थ्यांंना न्याय मिळणार आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या संदर्भात शिक्षण मंडळाला बारावीची फेरपरीक्षा पुन्हा घेणे किंवा संबंधित विद्यार्थ्यांचे पेपर पुन्हा घेणे, यापैकी योग्य वाटेल ती कारवाई करण्याचे निर्देश ९ मार्चला दिल्याचे कळले आहे. वेळापत्रकातील घोळामुळे कारंजा येथील विद्यार्थिनी परीक्षेपासून वंचित या म थळय़ाखाली लोकमतमध्ये ९ मार्चला वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. इंटरनेट व परीक्षा केंद्रावरील वेळापत्रकात नमूद वेळेच्या घोळामुळे राज्यातील जवळपास ३१२ विद्या र्थी विविध पेपरपासून वंचित झाले होते. यामध्ये कारंजा येथील ४, तर अकोला जिल्हय़ातील ४६ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यासंदर्भात कारंजा-मानोरा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी लोकमतमधील ९ मार्च रोजीच्या वृत्ताच्या कात्रणासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पत्र देऊन याबाबत दखलीची मागणी केली होती .
‘त्या’ ३१२ विद्यार्थ्यांना मिळणार न्याय
By admin | Updated: March 10, 2015 01:54 IST