शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वीज ग्राहकांच्या तक्रारींवर उहापोह ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 16:40 IST

वाशिम: जिल्ह्यात मीटर रीडिंग न घेता दिले जाणारे वीज बिल, तसेच वीज बिलांमधील चुकांविषयी वीज ग्राहकांनी सादर केलेल्या तक्रारींचा निपटारा विद्युत वितरण कंपनीने १५ दिवसांच्या आत करावा. तसेच या तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित ग्राहकाला देण्यात यावी, अशी मागणी शुक्रवारी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत अशासकीय सदस्यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात मीटर रीडिंग न घेता दिले जाणारे वीज बिल, तसेच वीज बिलांमधील चुकांविषयी वीज ग्राहकांनी सादर केलेल्या तक्रारींचा निपटारा विद्युत वितरण कंपनीने १५ दिवसांच्या आत करावा. तसेच या तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित ग्राहकाला देण्यात यावी, अशी मागणी शुक्रवारी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत अशासकीय सदस्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या बैठकीत वीजग्राहकांच्या विविध समस्यांवर उहापोह करण्यात आला. यात ग्रामीण भागात अनेक रोहित्रांवर क्षमतेपेक्षा अधिक भार असल्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. याठिकाणी पर्यायी रोहित्र उभारणी करण्याची कार्यवाही तातडीने करण्याची मागणी करण्यात आली. याविषयी माहिती देताना महावितरणचे उप कार्यकारी अभियंता एस. एस. देशपांडे म्हणाले, जिल्ह्यात एचव्हीडीएस योजनेंतर्गत एक किंवा दोन कृषिपंप जोडणीसाठी स्वतंत्र रोहित्र देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे वीज पुरवठा योग्य दाबाने होण्यास मदत होईल. यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन या तक्रारींचा निपटारा तातडीने करण्याच्या सूचना केल्या. त्याशिवाय हॉटेलमधील उघड्यावरचे खाद्य पदार्थ, पिण्याचे पाणी याची तपासणी अन्न व औषध प्रशासन विभागाने करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही वानखेडे यांनी केल्या. बैठकीला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मेहकरकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, वाशिमचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निरीक्षक कैलास भरकाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक जाधव, अन्न सुरक्षा अधिकारी नि. रा. ताथोड यांच्यासह प्रा. वीरेंद्र ठाकूर, डॉ. सागर आंबेकर, डॉ. राम बाजड, गजानन साळी, सुधीर घोडचर, कृष्णा चौधरी, भागवत कोल्हे, नामदेव बोरचाटे, संजय राऊत, प्रसन्न पळसकर, अभय खेडकर, हीना कौसर मो. मुबरशीर, अलका पाटील, प्रा. डॉ. शुभांगी दामले, विकास गवळी, डॉ. एम. एम. संचेती, धनंजय जतकर, प्रवीण पाटील वानखडे, सुधीर देशपांडे, वनमाला पेंढारकर हे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमconsumerग्राहक