शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांची नजर मंदिरांवर, देविदेवता कुलूपबंद; दानपेट्यांसह अन्य साहित्य लंपास करण्याचा सपाटा

By सुनील काकडे | Updated: September 21, 2022 18:23 IST

किन्हीराजा येथे पुरातन काळातील शेकडो वर्षे जुने हेमाडपंथी पद्धतीने माता कमलेश्वरीचे मंदिर वसलेले आहे.

वाशिम- सृष्टीचा निर्माण करणारे, भक्तांच्या हाकेला धावून येणारे, सर्वांचे रक्षण करणारे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देविदेवतांची मंदिरे चोरट्यांनी ‘टार्गेट’ करणे सुरू केले आहे. दानपेट्यांसह मंदिरातील इतर साहित्य लंपास करण्याचा जणू सपाटाच लागला असून या भितीपायी मंदिरे दिवसाही कुलूपबंद राहत असल्याचे किन्हीराजा (ता.मालेगाव) येथे दिसून येत आहे.

किन्हीराजा येथे पुरातन काळातील शेकडो वर्षे जुने हेमाडपंथी पद्धतीने माता कमलेश्वरीचे मंदिर वसलेले आहे. याशिवाय खंडोबारायांचे मंदिर, शिव मंदिर, समर्थ रामदास स्वामी यांच्या हस्ते स्थापित हनुमानाचे मंदिर. विश्वनाथ महादेव मंदिर, खोलेश्वर महादेव मंदिर आहे. नव्याने बांधण्यात आलेले संतसखू माता मंदिर, माता नवदुर्गा मंदिरानेही गावाची शोभा वाढली आहे.

कोरोना काळात लाॅकडाऊनमुळे सुमारे दोन वर्षे ही सर्व मंदिरे कडेकोट बंद होती. वर्षभरापासून मात्र निर्बंध हटल्याने मंदिरे खुली झाली. त्यायोगे दर्शनासाठी भाविकांची रिघ लागायला लागली असतानाच मंदिरातील देवांच्या मुर्ती, दानपेट्यांसह इतर साहित्यांवर चोरट्यांची वक्रदृष्टी पडली आहे. गावातील अनेक मंदिरातील देवांच्या मुर्ती, समई, नंदादिप, घंटे, साकळी, दिवे, दानपेट्या भर दिवसा चोरीला गेल्याच्या अनेक घटना गत काही दिवसांत समोर आल्या आहेत.भक्तांमध्ये भितीचे वातावरण

गत महिनाभरात किन्हीराजातील कमेलेश्वरी संस्थान, संत सखूमाता संस्थान व माता नवदुर्गा संस्थान, हनुमान मंदिर, विश्वनाथ महादेव मंदिर, केशवराया मंदिर या सर्व ठिकाणच्या दानपेट्या फोडून त्यातील हजारो रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. यामुळे पंचक्रोशितील भाविकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :washimवाशिम